Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीच्या हळद बाजारात सोन्याची झळाळी,61 हजाराचा उच्चाकिं दर

सांगलीच्या हळद बाजारात सोन्याची झळाळी,61 हजाराचा उच्चाकिं दर 


सांगली बाजारात हळद दराने सोने दराशी बरोबरी साधत क्विंटलला ६१ हजार दराचा ऐतिहासिक टप्पा बुधवारच्या सौद्यावेळी गाठला. आजच्या सौद्यात किमान १५ हजार ९०० तर सरासरी ३८ हजार ४५० रुपये हळदीला प्रती क्विंटल दर मिळाला.


सांगली कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वसंत मार्केट यार्डात बुधवारी निघालेल्या हळद सौद्यामध्ये ६१ हजार रुपये प्रती क्विंटल हा आजपर्यंतच्या इतिहासातील उच्चांकी दर मिळाला. 



सदरची राजापुरी हळद एन. बी. पाटील, शिरगावकर यांच्या अडत दुकानामध्ये अरिहंत बाबु गुळण्णावर व बसाप्पा पराप्पा कोकटनुर या कर्नाटकातील यरगट्टी (ता. अथणी) या शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली होती. बाजार समितीचे परवाना धारक खरेदीदार मनाली ट्रेडिंग कंपनी यांनी खरेदी केली. सध्या हळद या शेतीमालास उच्चांकी भाव मिळत असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. उच्च दर्जाची हळद उत्पादित करुन उच्चांकी दर मिळाल्याबद्दल शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात खरेदीदार , व्यापारी, शेतकरी, हमाल आदी उपस्थित होते. गुणवत्तेवर हळदीला चांगला दर मिळत असून शेतकऱ्यांनी हळद शेतीमाल सांगलीमध्ये विक्रीसाठी आणावा असे आवाहन सभापती मा. सुजयनाना शिंदे व सचिव महेश चव्हाण यांनी केलेले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.