Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आमची गरज संपली : कंगनाला उमेदवारी मिळताच 4 टर्म खासदाराने व्यक्त केली मनातली खदखद

आमची गरज संपली : कंगनाला उमेदवारी मिळताच 4 टर्म खासदाराने व्यक्त केली मनातली खदखद 

हिमाचल प्रदेशात मंडी लोकसभा मतदारसंघात भाजपने अभिनेत्री कंगना रणौतला उमेदवारी दिलीय. यानंतर भाजपचे माजी खासदार महेश्वर सिंह यांनी मनातली खदखद व्यक्त केलीय. त्यांनी माजी मुख्यमंत्री शांता कुमार यांच्या वक्तव्याचेही समर्थन केले आहे.

कुल्लूचे भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी खासदार महेश्वर सिंह म्हणाले की, वरिष्ठांनी मंडी लोकसभा मतदारसंघात कंगनाला उमेदवारी जाहीर केलीय. त्यासाठी कंगनाचं अभिनंदन, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वात मोठे विद्वान आणि बुद्धिमान अनुभवी लोक आहेत.

महेश्वर सिंह यांनी म्हटलं की, सर्व काही पाहूनच कंगनाला उमेदवार बनवलं आहे. पार्टीने सर्वेसुद्धा केला आहे. त्यामुळे कंगना त्यात आमच्यापेक्षा पुढे असू शकते आणि आम्ही मागे असू. सिद्धांताच्या राजकारणाची विचारधारा बदलली असल्याचंही ते म्हणाले.

वेळ बदलली आहे. आधी पक्षाचं कुटुंब लहान होतं आणि छोट्या मोठ्या चर्चा व्हायचा. आता पक्षाच्या कुटुंबाचा विस्तार झाला आहे. त्यामुळे पक्ष आणखी जास्त सर्वे करतो. सर्वेत जो उमेदवार योग्य वाटतो त्याला तिकिट दिलं जातं. आमचे काही म्हणणे नाही असं महेश्वर यांनी म्हटलं. आम्ही कोणत्याही गोष्टीचा विरोध करणार नाही. पक्ष जर म्हणाला की निवडणूक प्रचार करा तर पाठिंबा देऊ. कदाचित पक्षाला आमच्या पाठिंब्याचीही आता गरज नसावी असं म्हणत महेश्वर सिंह यांनी मनातली खदखद व्यक्त केली.

महेश्वर सिंह हे कुल्लू जिल्ह्यातील राजघराण्याशी संबंधित आहेत. मंडीमधून ते तीनवेळा लोकसभा खासदार तर एकदा राज्यसभा खासदार होते. मंडीमधून लोकसभा लढण्यासाठी ते इच्छुक होते. पण तिकिट मिळालं नाही. महेश्वर हे आमदारसुद्धा होते. कुल्लूमध्ये असलेल्या भगवान रघुनाथ मंदिराचे ते पुजारी आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.