ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची 485 कोटीची रक्कम जप्त! 11 बॅंक खाती फ्रीज!
दिल्ली : काँग्रेसने त्यांना मिळालेल्या निधीमध्ये 14.9 लाख हे रोख मिळाले होते आयटीआर मध्ये त्याचे विश्लेषण केले नाही म्हणून सात वर्षांपूर्वीच्या या विषयावरून आयकर खात्याने काँग्रेसची 11 खाती फ्रीज केली त्याचबरोबर तीस वर्षांपूर्वी सिताराम केसरी अध्यक्ष असताना त्यांनी आयटीआय जोडले नाहीत म्हणून काँग्रेसची एकूण 485 कोटी रुपयांची बँक खाते जप्त केली आहेत.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर आयकर खात्याने ही कारवाई केल्याने काँग्रेसची मोठी कोंडी झाली आहे. त्यांच्या नेत्यांना कुठेही पाठवता येत नाही. विमानाची तिकिटे काढता येत नाहीत. पत्रके देखील तयार करता येत नाहीत अशी अशी स्थिती असून देशाच्या राजकारणात प्रथमच हे घडते आहे अशी टीका राहुल गांधी यांनी केली असून काँग्रेसने हातबलता व्यक्त केली आहे.
कोणत्याही राजकीय पक्षाला आयकर भरण्यापासून सवलत आहे. फक्त त्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरणे आवश्यक आहे. अशा स्वरूपाची कायद्यामध्ये तरतूद आहे. अर्थात तीस वर्षांपूर्वी झालेल्या चुकीसाठी आत्ता सर्व खाती सील करणे, तसेच 14 लाख रुपयांच्या रकमेची मांडणी केली नाही, म्हणून तब्बल 200 कोटींचा दंड करणे हे अनाकलनीय असल्याचे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे.
काल दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व काँग्रेसने त्या सोनिया गांधी यांच्या समवेत पत्रकार परिषद घेऊन ही टीका केली त्यानंतर लागलीच भाजपच्या वतीने रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये 2021 मध्येच काँग्रेसला या संदर्भात नोटीस दिली होती, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी आता भाजपवर टीका करू नये. हा देश सर्वात मोठा लोकशाहीवादी देश आहे आणि भाजपही लोकशाहीवादी आहे. त्यामुळे काँग्रेसने स्वतःच्या चेहरा आरशात पहावा. इतरांवर टीका करू नये अशी टीका केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.