Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

देवदर्शनासाठी निघालेल्या 4 मित्रांवर काळाचा घाला, भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

देवदर्शनासाठी निघालेल्या 4 मित्रांवर काळाचा घाला, भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

देवदर्शनासाठी निघालेल्या 4 मित्राचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना लातूरमध्ये घडली आहे. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघातात झाला. नांदेड-लातूर महामार्गावरून भरधाव वेगाने जाणार कार ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की यात कारचा अक्षरशाच चक्काचूर झाला. या अपघातात कारमधील चार जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हा अपघात लातूर-नांदेड महामार्गावरील महालंग्रा गावाजवळ पहाटे 3 वाजताच्या सुमारास घडला. कारमधील सर्वजण तुळजापूर येथील तुळजा भवानी मंदिरात दर्शनासाठी जात होते. परंतु कार भरधाव वेगात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर जाऊन आदळली, अशी माहिती समोर येत आहे. स्थानिकांकडून अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

कारमधून प्रवास करत असलेले मोनू बालाजी कोतवाल (27), शिवराज हरिश्चंद्र लंकाधाई (26), कृष्णा मांडके (24) आणि नरमन राजाराम कात्रे (33) हे जागीच ठार झाले अशी माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे, तर शुभम लंकाधाई हा या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याला लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघातातील सर्व मृत तरुण हे नांदेड येथील रहिवासी होते. तुळजापूरला तुळजाभवानीच्या दर्शनासाठी ते जात होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या अपघातात कारने ट्रॅक्टरच्या ट्ऱॉलीला दिलेली धडक एवढी भीषण होती की कारचा पुढील भाग चक्काचूर होऊन तुटला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

कार एका ट्रकला धडकून तीन जण ठार

दुसऱ्या कार अपघातात दिल्लीतील बदरपूर उड्डाणपुलावर भरधाव कार एका ट्रकला धडकल्याने तीन जण ठार झाले, तर चार जखमी आहेत. शनिवारी रात्री उशिरा हे 7 जण हरियाणातील फरिदाबाद येथील एका लग्नातून दिल्लीला परतत असताना हा अपघात झाल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार उड्डाणपुलावरील दुभाजकाला धडकल्याचे तपासात समोर आले आहे. धडकेमुळे कार दुभाजकावरून उडाली आणि समोरील कॅरेजवेवर उतरली आणि तिथे ती ट्रकला धडकली असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.