Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ट्रक आणि व्हॅनची जोरदार धडक, 3 चिमुकल्यांसह 9 लोकांचा मृत्यू

ट्रक आणि व्हॅनची जोरदार धडक, 3 चिमुकल्यांसह 9 लोकांचा मृत्यू

ट्रक आणि व्हॅनची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात 3 चिमुकल्यांसह 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भरधाव व्हॅन ट्रकवर आदळली आणि हा अपघात झाला. सोमवारी टुलम रिसॉर्टपासून 120 किमी अंतरावर हा अपघात झाला.

या अपघातात एकूण 9 जणांचे मृतदेह ताब्यात पोलिसांनी घेतले, त्यापैकी मृतांमध्ये तीन चिमुकल्यांचाही समावेश आहे. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. ट्रकला व्हॅन धडकल्यानंतर आग लागली, त्यामुळे ही दुर्घटना घडली. दोन जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.


मेक्सिकोमध्ये व्हॅन ही प्रवासासाठी सर्वात जास्त वापरली जाते. हा भाग किनाऱ्यापासून काही अंतरावर आहे. या भागात पर्यटक क्वचितच येतात. मृत व्यक्ती या स्थानिक रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. कॅरिबियन किनारा अधिक विकसित होत आहे त्यामुळे स्थानिक महामार्गांवर अधिक अपघातांचं प्रमाण वाढत असल्याचं समोर आलं आहे.

रस्ते अपघातात 19 जणांचा मृत्यू झाला

जानेवारी महिन्यात मेक्सिकोमध्ये एक भीषण रस्ता अपघात झाला होता. ज्यात प्रवासी बस आणि ट्रक यांच्यात भीषण टक्कर होऊन १९ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच 18 जण जखमी झाले. बसमध्ये 37 जण होते, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले होते. हा अपघात पॅसिफिक किनारपट्टीच्या सिनालोआ राज्यातील महामार्गावर झाला. राज्याच्या नागरी संरक्षण कार्यालयाचे संचालक रॉय नवरेते यांनी सांगितले की, माझाटलान बंदर शहराजवळील अलोटा टाउनशिपमध्ये हा अपघात झाला.

 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.