लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांच्या कारचा भीषण अपघात, 3 चिमुकल्यांसह 8 जण ठार
बिहारमधील खडगिया येथे भीषण रस्ते अपघात झाला आहे. लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांच्या कारची आणइ ट्रॅक्टरची धडक झाली. या अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 13 लहान मुलांचाही समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, कारमधील वऱ्हाडी चौथम प्रखंड भागात लग्नासाठी गेले होते. लग्नाहून परत येत असताना एनएच-31 मार्गावर कारची ट्रॅक्टरसोबत धडक झाली. या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला असून 4 गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी आणि प्रशानाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात पसराहा पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या विद्यारत्न पेट्रोल पंपाजवळ झाला आहे.
मृतांची नावे –
गौतम ठाकूर (वय – 32), मोनू कुमार (वय – 7), अमन कुमार (वय – 25), बंटी ठाकूर, (वय – 22), अंशु कुमार (वय – 23), पलटू ठाकूर (वय – 50), दिलो कुमार (वय- 10) आणि प्रकाश सिंह (वय – 50)
जखमींची नावे –
सच्ची कुमार (वय – 26), धर्मेंद्र कुार (वय – 27), कन्हैया कुमार (वय – 23) आणि कुंदन कुमार
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.