प्रकाश आंबेडकर आहेत कोट्याधीश "3 कोटीचे घर,42 लाखाची जमीन
2024 च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीसोबत युती होणार कि नाही यावरून मागील काही दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. मात्र दोन्ही पक्षांमध्ये वाटाघाटी न झाल्याने आज अखेर वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर करन्यात आली. ही यादी जाहीर करत आपण मविआसोबत लढणार नसल्यचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. दरम्यान, त्यांच्या उमेदवारांना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाठिंबा देणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या यादीत प्रकाश आंबेकदार यांचाही समावेश आहे. ते अकोला मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत.
प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोला येथे पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या 8 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली. त्याचबरोबर नागपुरात काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे बोलले जात आहे. पक्षप्रमुख आणि भीमराव आंबेडकर यांचे पुत्र प्रकाश आंबेडकर अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता त्याच्या संपत्तीविषयी माहिती समोर येत आहे.
प्रकाश आंबेडकर हे व्यवसायाने वकील असून त्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाला आपल्या संपत्तीविषयी माहिती दिली होती. त्यानुसार त्यांची एकूण संपत्ती 5.87 कोटी रुपये आहे. यातील मोठा हिस्सा त्याच्या घराचा आहे, ज्याची किंमत 3.2 कोटी रुपये आहे. याशिवाय त्यांच्याकडे 42 लाख रुपये किमतीची शेती योग्य जमीन आहे. त्याच बरोबर एक कोटी रुपयांची पडीक जमीन आहे.
2014 मध्ये प्रकाश 3.57 कोटी रुपयांचे मालक होते
2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यावेळी त्यांच्याकडे एकूण 3.57 कोटी रुपयांची संपत्ती होती. 2019 मध्ये ती वाढून 5.87 कोटी झाली. 2018-19 मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न 8.6 लाख रुपये होते. त्याच वर्षी त्यांच्या पत्नीचे उत्पन्न 21 लाखांपेक्षा जास्त होते. प्रकाश यांच्या नावावर 6 बँक खाती आहेत. त्यापैकी 4 बँक ऑफ बडोदामध्ये आहेत. त्याच्याकडे ५९ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे बाँड आणि शेअर्स आहेत.
स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार
यावेळी वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीपासून वेगळी होऊन एकट्याने निवडणूक लढवणार आहे. पक्षाने 8 जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केलीत. अकोल्यात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “काल मनोज जरंगे पाटील यांच्याशीही आमची प्रदीर्घ चर्चा झाली. त्यांनी अद्याप कोणताही पक्ष काढलेला नाही, मात्र मराठवाड्यातील अनेक भागात त्यांचा प्रभाव आहे. अशा स्थितीत मराठवाड्यातील अनेक भागांत त्यांचा प्रभाव आहे. त्यांच्या संघटनेशीही करार करण्याची चर्चा आहे.” वंचित बहुजन आघाडी नागपुरात काँग्रेसला आणि सांगलीच्या जागेवर ओबीसी बहुजन पक्षाचे प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा देणार आहे.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार
अकोला – प्रकाश आंबेडकरभंडारा – संजय केवटवर्धा – प्राध्यापक राजेंद्र साळुंखेयवतमाळ – खेमसिंग प्रतापराव पवारचंद्रपूर – राजेश बेळेबुलढाणा – वसंत राजाराम मगरगडचिरोली – हितेश मढवीअमरावती – प्राजक्ता पिल्लईवान
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.