चित्रपटसृष्टीला धक्काः प्रसिद्ध अभिनेत्याचे रस्ते अपघातात निधन, 27 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
साऊथ फिल्मस्टार डॅनियल बालाजी यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतून आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते चान्स पेर्डोमो याने वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. या बातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. अभिनेत्याच्या निधनामुळे सेलिब्रिटींपासून चाहत्यांपर्यंत शोककळा पसरली आहे. चान्स पेर्डोमो 'जेन व्ही मुमिन व्हॅली' आणि 'आफ्टर वी फेल' यासह अनेक वेब सीरिजचा भाग आहे.
हॉलिवूड अभिनेता चान्सच्या प्रमोटरने चान्स पेर्डोमोच्या मृत्यूची माहिती एका निवेदनाद्वारे दिली आहे. व्हरायटीला दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, 'आम्ही जड अंतःकरणाने जाहीर करतो की अभिनेता चान्स पेर्डोमो यांचे बाईक अपघातात निधन झाले आहे.'अभिनेते चान्स पेर्डोमो याचे अगदी लहान वयात निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता चान्स पेर्डोमोचा अपघात कुठे आणि कधी झाला याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र, वयाच्या 27 व्या वर्षी त्याच्या निधनाने चाहते दुःखी झाले आहेत.
चान्स पेर्डोमोने लहानपणापासूनच अभिनयाला सुरुवात केली आहे. त्यांनी वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी 'लाँग फील्ड ड्राइव्ह' या त्यांच्या पहिल्या लघुपटातून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र, चान्सला खरी ओळख 'आफ्टर वी फेल' या चित्रपटातून मिळाली. याशिवाय तो अनेक टीव्ही शोचा भागही होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.