Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मराठी माणसाच्या हातात राष्ट्रीय तपास यत्रणेची सूत्र :, 26/11 हल्ला दरम्यान मोठी भूमिका बाजवलेली होती

मराठी माणसाच्या हातात राष्ट्रीय तपास  यत्रणेची सूत्र :,  26/11 हल्ला दरम्यान मोठी भूमिका बाजवलेली होती 

IPS सदानंद वसंत यांच्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. NIA चे डायरेक्टर जनरल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवल्यानंतर सोशल मीडियावर त्यांना शुभेच्छा येत आहेत.

दिनकर गुप्ता NIA चे महासंचालक होते. ते 31 मार्च रोजी निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदानंद दाते यांच्याकडे महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. सदानंद वसंत दाते कोण आहेत आणि त्यांचा प्रवास जाणून घेऊया.

सदानंत दाते यांचं नावं आणखी एक गोष्टीसाठी चर्चेत आहे. 26 नोव्हेंबर 2008 च्या रात्री मुंबई हल्ल्याच्या वेळी आयपीएस सदानंद देते हे पहिल्या काही अधिकाऱ्यांमध्ये होते. त्यांचं धाडस, शौर्य, कौशल्य आणि त्यांच्या युक्तीमुळे अनेक नागरिकांचे प्राण वाचले. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.

26/11 हल्ला ही माझ्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक घटना आहे आणि ती माझ्या आयुष्यभर लक्षात राहील. "मी शक्य तितके सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न केले असं ते एका वृत्तपत्राला मुलाखत देताना म्हणाले होते. सदानंद दाते यांनी सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनमध्ये डीआयजी आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये IG (Ops) म्हणूनही काम पाहिलं आहे. मुंबईजवळील मीरा-भाईंदर आणि वसई-विरार शहराचे पोलिस आयुक्तपदही त्यांनी भूषवले आहे.

सदानंद दाते एटीएस प्रमुख असताना एनआयएने महाराष्ट्र काही महत्वाची आणि प्रमुख ऑपरेशन राबवली.पुण्यातील आयसीस प्रकरण तसेच पडघा जवळील बोरिवली गावातील आयसीएस प्रकरण ही मोठी ऑपरेशन झाली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.