मुंबई क्राईम ब्रांचची आज पर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई :, तब्ब्ल 232 कोटी 28 लाखाचे ड्रग्ज हस्तगत
मुंबई क्राईम ब्रांचने आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. मुंबईतून तब्बल 232 कोटी 28 लाखांचे ड्रग्ज हस्तगत करण्यात आले आहेत. गुन्हे शाखेने मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे ड्रग्ज माफियांचे धाबे दणाणले आहेत.
मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 7 चहा पथकाने ही करावाई केली आहे. एकूण 252 कोटी 28 लाख किमतीचे एमडी ड्रग्ज हस्तगत करण्यात आले आहे. यामध्ये एकूण दहा आरोपींना अटक करण्यात आले आहे. त्यात एक महिलेचा देखील समावेश आहे. एक महिला आणि पुरुष याला कुर्ला येथून अटक करण्यात आले होते व त्यांच्याकडून काही प्रमाणात एमडी चा साठा जप्त करण्यात आला होता.
आरोपींच्या अटकेनंतर पोलिसांनी जेथून हे ड्रग्ज आणले जातात त्या ड्रग्ज फॅक्टरीचाच धोश लावला. तपासात असे निष्पन्न झाले की ही फॅक्टरी सांगली येथे तालुका कवठेमहांकाळ येथे आहे. मुंबई पोलीस पथकाच्या गोपनीय माहितीनुसार करून तांत्रिक तपासाच्या आधारे अंमली पदार्थाची तस्करी करणारी टोळी तसेच अमली पदार्थ बनवण्याचा कारखाना सांगली येथे उद्ध्वस्त करून धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये 126.141 किलोग्रॅम चा वजनाचा माफेडोन अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून त्याची जवळजवळ किंमत 252 कोटी 28 लाख एवढी आहे. या प्रकरणात 10 आरोपींना अटक केली असून सध्या पोलीस कोठडीत असल्याचे मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 7 चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.