Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काँग्रेसचं ठरलं! 'या' 22 मतदारसंघातून निवडणूक लढवणार

काँग्रेसचं ठरलं! 'या' 22 मतदारसंघातून निवडणूक लढवणार

आगामी लोकसभा निवडणुकीची  आचारसंहिता कधीही लागू शकते आणि त्यामुळेच सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. अशात महाविकास आघाडीतील  जागावाटपाबाबत अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, असे असताना राज्यातील एकूण 22 लोकसभेच्या जागेवर निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसची  तयारी झाली असून, यासाबाबत आज महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. आजच्या बैठकीत या सर्व 22 जागांवर चर्चा होणार असून, यापैकी 18 ते 20 जागा काँग्रेस लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

22 पैकी18 ते 20 जागा काँग्रेस लढवणार

महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या जागांचा आज आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीत एकूण 22 जागांचा आढावा घेतला जाणार आहे. ज्यात 18 ते 20 जागा काँग्रेस लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे आजच्या बैठकीत ज्या 22 मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे, त्या मतदारसंघातून उमेदवार कोण असणार याची देखील चाचपणी केली जाणार आहे.

बैठकीत यांची उपस्थिती...

महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात जागा लढवण्याबाबत काँग्रेस नेत्याचं एकमत झालं आहे. आजच्या बैठकीत एकूण 22 जागांचा आढावा घेतला जाणार आहे. थोड्याच वेळात टिळक भवनमध्ये काँग्रेसच्या या बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, नसीम खान यांच्यासह सर्व जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष असतील. सोबतच त्या-त्या मतदारसंघातील काही इच्छुक उमेदवार देखील या बैठकीत असणार आहे. या बैठकीत सर्व 22 जागांचा आढावा घेतला जाईल.

कोणत्या जागा काँग्रेस लढणार...

भिवंडी लोकसभा मतदारसंघ
पुणे लोकसभा मतदारसंघ
सोलापुर लोकसभा मतदारसंघ
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ (छ. शाहू महाराज यांच्यासाठी सोडण्याची शक्यता)
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ
सांगली लोकसभा मतदारसंघ
धुळे लोकसभा मतदारसंघ
जालना लोकसभा मतदारसंघ
रामटेक लोकसभा मतदारसंघ
नांदेड लोकसभा मतदारसंघ
यवतमाळ लोकसभा मतदारसंघ
भंडारा लोकसभा मतदारसंघ
हिंगोली लोकसभा मतदारसंघ
नागपुर लोकसभा मतदारसंघ
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ
अमरावती लोकसभा मतदारसंघ
गोंदिया लोकसभा मतदारसंघ
गडचिरोली लोकसभा मतदारसंघ, यासह एकूण जागांचा आढावा काँग्रेसकडून घेतला जाणार आहे...
मुंबईतील जागांचाही आढावा घेणार...

प्रदेश काँग्रेसकडून आज राज्यातील 22 लोकसभेच्या जागांचा आढावा घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे ही बैठक संपल्यावर मुंबई काँग्रेसकडून मुंबईतील जागांचा आढावा घेतला जाणार आहे. महाविकास आघाडीत मुंबईत देखील काँग्रेसला जागा सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागेसाठी इच्छुक कोण आहेत, त्या मतदारसंघातील पक्षातील परिस्थिती या सर्वांचा बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.