प्रेमप्रकरणावरून वाद, मुलीने आईचं बोट चावून तोडलं; आईने 19 वर्षीय लेकीला संपवलं
मुंबई : प्रेमप्रकरणावरून मुलगी आणि आई यांच्यात झालेल्या वादात मुलीने आईचे बोट तोडलं होतं. याचाच राग मनात ठेवून आईने १९ वर्षांच्या लेकीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. वाद्रे पूर्व इथं खेरवाडी परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी टीना उमेश बागडे हिला अटक केलीय.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, टीना उमेश बागडे ही मुलगी भूमिका आणि दोन मुलांसोबत राहत होती. खेरवाडीच्या गणपत चाळीत त्यांचे घर आहे. टीनाच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. टीनाची मुलगी ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकत होती. तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्यावरून टीना आणि भूमिका यांच्यात वाद झाला.
मुलगी भूमिकाच्या प्रेमप्रकरणावरून तिचा आईशी वाद झाला. सोमवारीही त्यांच्यात वाद झाला. तेव्हा हाणामारीही झाली. तेव्हा टीनाने आईच्या बोटाचा चावा घेतला. यावेळी बोटाचा तुकडा पडला. तेव्हा आई टीना हिने मुलगी भूमिकाचा गळा दाबून खून केला. भूमिकाच्या शवविच्छेदन अहवालात तिचा गळा दाबला गेल्याने मृत्यू झाल्याचं समोर आलंय. पोलिसांनी टीना बागडे हिच्यावर गुन्हा दाखल केला असून तिच्यावर अटकेची कारवाई केली आहे.
टीनाने मुलीचा खून केल्यानंतर तिला फिट आल्याचं भावाला सांगितलं. त्यानंतर भूमिकाला व्हीएन देसाई रुग्णालयात नेलं पण तिला मृत घोषित करण्यात आले. डॉक्टरांनी याबाबत पोलिसांना कळवले. पोलिसांनी पंचनामा केला तेव्हा तिच्या मानेवर जखमा आढळून आल्या. त्यामुळे आई सांगत असलेल्या घटनाक्रमावर संशय निर्माण झाला. भूमिकाच्या लहान भावंडासमोरच आईने तिला मारलं. पण आईने लहान मुलांना हे कोणालाही सांगू नका अशी धमकी दिली. भूमिकाला आधीपासून फिट यायची, त्यावर उपचारही घेतले होते. त्याचाच आधार घेत आई टीनाने तिला फिट आल्याचं सांगत बनाव रचण्याचा प्रयत्न केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.