शेजाऱ्यांच्या छळाला कंटाळून 18 वर्षीय तरुणीची आत्महत्या
उत्तर प्रदेशमधील फतेहपूर येथे एका 18 वर्षीय तरुणीने शेजारी राहणाऱ्या दोन पुरुषांनी छळ केल्यामुळे आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तिच्या शेजारी राहणाऱ्या दोन लोकांकडून तिचा छळ झाल्यानंतर तिने शनिवारी सकाळी स्वतःला पेटवून घेतलं. ही दोनं लोकं आपला विनयभंग करत असल्याचा आरोपही मुलीनं केला होता.
नेमकं काय घडलं
पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, मुलगी तिच्या घरी जात असताना शेजारी राहणाऱ्या दोन लोकांनी तिचा छळ केला. या घटनेमुळे अस्वस्थ होऊन तिने घरातच स्वतःला पेटवून घेतलं. श्वास घेण्यापूर्वी शेवटी तिने आईला त्रास देणाऱ्या दोन लोकांची नावे सांगितली. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
कुटुंबीयांची ही मागणी
या प्रकरणी माहिती देताना फतेहपूरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय शंकर मिश्रा म्हणाले की, "कुटुंबातील सदस्यांनी शेजाऱ्यांवर विनयभंगाचा आरोप केला आहे. फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे आणि तपास सुरू आहे. आरोपींना लवकरच अटक केली जाईल. तर "पीडित कुटुंबीयांची मागणी आहे की, आरोपींना अटक होईपर्यंत मुलीचं शवविच्छेदन करू नये.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.