Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

केंद्र सरकारने घातली 18ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी

केंद्र सरकारने घातली 18 ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी

आक्षेपार्ह मजकुराबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मोठे पाऊल उचलले आहे. चेतावणी देऊनही, अश्लील मजकूर दाखवण्यावर कारवाई करत, सरकारने 18 ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. यासोबतच 19 वेबसाइट, 10 ॲप्स, 57 सोशल मीडिया हँडलवरही बंदी घालण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली अश्लीलता दाखवणाऱ्या या व्यासपीठांना इशारा दिला होता. याबाबत नुकतीच शासनाकडून कडक कारवाई करण्यात आली. आक्षेपार्ह आणि अश्लील मजकूर दाखवणाऱ्या या प्लॅटफॉर्मवर देशभरात बंदी घालण्यात आली आहे. अहवालात असे सांगण्यात आले आहे की या प्लॅटफॉर्मवर सरकारकडून अश्लील आणि आक्षेपार्ह मजकुराबाबत अनेक इशारे देण्यात आले होते, त्यानंतर अलीकडेच आईबी मंत्रालयाने 18 ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. Ban on OTT platform यासोबतच भारतात 19 वेबसाइट, 10 ॲप्स, 57 सोशल मीडिया हँडल ब्लॉक करण्यात आले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.