आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची यादी जाहीर झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यभरातील 16 उमेदवारांची यादी शिवसेना ठाकरे गटानं जाहीर केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, "हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे. मुंबई दक्षिण मध्य:श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे."
ठाकरेंचे कोणते शिलेदार लोकसभेच्या रिंगणात?
बुलढाणा - नरेंद्र खेडेकरयवतमाळ-वाशिम - संजय देशमुखमावळ - संजोग वाघेरे-पाटीलसांगली -चंद्रहार पाटीलहिंगोली - नागेश पाटील आष्टीकरछत्रपती संभाजीनगर - चंद्रकांत खैरेधाराशिव - ओमराजे निंबाळकरशिर्डी- भाऊसाहेबर वाघचौरेनाशिक - राजाभाई वाजेरायगड - अनंत गीतेसिंधुदुर्ग-रत्नागिरी - विनायक राऊतठाणे - राजन विचारेमुंबई-ईशान्य - संजय दिना पाटीलमुंबई-दक्षिण - अरविंद सावंतमुंबई-वायव्य - अमोल कीर्तिकरपरभणी - संजय जाधवमुंबई दक्षिण मध्य - अनिल देसाई
ठाकरे गटाकडून आज लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पण अद्याप चार ते पाच जागांवरील उमेदवारांची घोषणा होणं बाकी आहे. वंचितच्या भूमिकेनंतर या चार ते पाच जागांवरील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांच्या वतीनं मिळत आहे. अशातच ठाकरेंकडून कल्याणच्या जागेसाठीही अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. कल्याणमध्ये महायुतीकडून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जवळपास निश्चित आहे. श्रीकांत शिंदेंविरोधात ठाकरे गटाकडून केदार दिघेंना उमेदवारी देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे कल्याणमध्ये ठाकरेंकडून लोकसभेच्या रिंगणात कोण उतरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.