चिरंजवी यांच्या डोक्यावर छत्री धरणाऱ्या चिमुरड्याकडे 1300 कोटीची संपत्ती, एका सिनेमा साठी घेतो 100 कोटी
दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीच्या डोक्यावर छत्री धरलेला लहान मुलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा मुलगा नेमका कोण आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर हा आहे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार राम चरण. राम चरण तेजा नुकताच 39 वर्षांचा झाला. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया राम चरण याच्या जीवनशैलीबद्दल
2007 मध्ये ‘चिरूथा’ या चित्रपटातून राम चरणच्या अभिनय कारकिर्दीला सुरूवात झाली. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्टार्सपैकी एक म्हणून राम चरणचे नाव घेतले जाते. गेल्या वर्षीच ‘आरआरआर’ चित्रपटातील नाटू-नाटू या गाण्याकरीता ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.
1,300 कोटी रूपयांची संपत्ती
मिळालेल्या माहितीनुसार, राम चरण एका वर्षात 30 कोटींहून अधिक कमावतो. त्याच्या एका चित्रपटासाठी 20 कोटी रूपये घेतो. RRR या ब्ल़ॉकबस्टर चित्रपटासाठी त्याने 45 कोटी रूपये घेतले होते. राम चरण हैदराबादच्या सर्वात श्रीमंत कुटुंबातील आहे. तो प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवीचा मुलगा आहे. राम चरण आपल्या कुटुंबासमवेत हैदराबादमध्ये राहतो. त्यांचे राहते घर अतिशय आलिशान आहे. या घराची किंमत तब्बल 30 कोटी रुपयांहून अधिक आहे. त्याशिवाय त्याचा मुंबईमध्येही एक आलिशान बंगला आहे.अभिनयाव्यतिरिक्त राम चरण एक उत्कृष्ट उद्योगपती देखील आहे. त्याचे एक प्रोडक्शन हॉऊस आहे. त्याचबरोबर ट्रूजेट एअरलाइन्सचा अध्यक्ष आहे. यामध्ये 127 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच राम चरण हैदराबादमधील पोलो रायडिंग क्लबचा मालक आहे. राम चरण यांना आलिशान गाड्यांची हौस आहे. राम चरणच्या कार कलेक्शनमध्ये अॅस्टन मार्टिन, BMW 7 सीरीज, मर्सिडीझ बेंझ एस क्लास आणि रेंज रोव्हर वोग सारख्या आलिशान गाड्या आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.