Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुणे जिल्हयातून 'हे ' 12 सराईत गुन्हेगार तडीपार :, पोलीस आयुक्ताची कारवाई

पुणे जिल्हयातून 'हे ' 12  सराईत गुन्हेगार तडीपार :, पोलीस आयुक्ताची कारवाई 

पुणे :येरवडा, विमानतळ, चतुःशृंगी, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या १२ गुन्हेगारांवर परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त विजय मगर  यांनी तडीपारीची कारवाई केली. आरोपींवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तडीपार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये हरजितसिंग ऊर्फ सोनु सरबजितसिंग सिध्दु ( ४५ रा, नागपुरचाळ, येरवडा), विकास ऊर्फ महाराज भगत तौर (३६, रा. लक्ष्मीनगर येरवडा), अजय गणेश राठोड, ( २४ रा.जयजवान नगर येरवडा), रुपेश दिलीप आडागळे (२४, रा. जयप्रकाश नगर येरवडा), शंकर मानु चव्हाण, ( ५४ वर्षे, रा. पांडु लमाण वस्ती येरवडा). तर बळीराम सुदाम पतंगे, ( २३ वर्षे, रा.खराडी, अरबाज असलम शेख, ( २२ वर्षे, रा.एस.आर.ए. बिल्डींग विमाननगर), योगेश प्रकाश म्हस्के, (रा. यमुनानगर विमाननगर) असे विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तडीपार करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

याचबरोबर गणेश यमनप्पा कुर्डेकरी, ( २४ वर्षे, रा. पांडवनगर), सोमनाथ ऊर्फ सोम्या धोत्रे, ( ४५ वर्षे, वडारवाडी) असे चतुश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तडीपार करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गौरव ऊर्फ महादु सातव (३३ वर्षे, रा. आव्हाळवाडी ता. हवेली) महेंद्र संभाजी कुटे, ( ३८ वर्षे, रा. आव्हाळवाडी ता. हवेली) या १२ जणांना पुणे, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. पोलीस ठाण्याकडून प्राप्त झालेल्या तडीपार प्रस्तावाची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.