10 हाजाराची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात
सातबाऱ्याला फेरफार नोंद घेण्यासाठी व इतर महसूल रेकॉर्डवर नावे लावण्यासाठी १० हजाराची लाच घेतांना चांदवड तालुक्यातील तलाठी विजय राजेंद्र जाधव हे लाच लुपपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. तक्रारदाराकडे १५ हजाराची मागणी करण्यात आली पण, तडजोडी अंतर १० हजाराची लाच स्विकारली. या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांच्या आई ,मामा तसेच मामांच्या मुली व मावशी यांनी कुंदलगाव ता .चांदवड येथील शेती वाटपा साठी निफाड दिवाणी कोर्टात दावा दाखल केला होता.
कोर्टात त्यांचा समझोता होऊन कोर्टाच्या आदेशानुसार कुंदलगाव ता चांदवड येथील गट नंबर 410,412,414 या गटातील 50-50 गुंठे जमीनीवर तक्रारदाराच्या आई तसेच त्यांचे मामा व इतर नातेवाईक यांच्या नावांची सातबाऱ्याला फेरफार नोंद घेण्यासाठी व इतर महसूल रेकॉर्डवर नावे लावण्यासाठी तहसीलदार चांदवड यांचे कडे अर्ज केला होता. तो अर्ज पुढील कार्यवाही साठी मंडल अधिकारी यांचे मार्फत यातील आलोसे यांच्याकडे देण्यात आला होता.या कामासाठी यातील आलोसे यांनी तक्रारदाराकडे पंचांसमक्ष लाचेची मागणी करून ती स्वीकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.