Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अल्लू अर्जुनच्या'श्रीवल्ली'वर आयुक्त थिरकले! तरुणांना लाजवेल असा डान्स तुम्ही पाहिलात का? पाहा VIDEO

अल्लू अर्जुनच्या'श्रीवल्ली'वर आयुक्त थिरकले! तरुणांना लाजवेल असा डान्स तुम्ही पाहिलात का? पाहा VIDEO

व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. महापालिका आयुक्त हा शहरातील अतिशय महत्त्वाच्या पदावरील आणि मोठी जबाबदारी असलेला व्यक्ती. पण या पद आणि जबाबदारीच्या पलिकडे ती व्यक्ती एक माणूस आहे, याचाही आपण विचार करायला हवा. त्यामुळे त्या व्यक्तीलाही मनसोक्त डान्स करण्याचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया शहरातील सर्वसामान्यांकडून दिल्या जात आहेत. महापालिका आयुक्तांच्या नृत्याचे व्हिडीओ देखील भन्नाट आहे. या व्हिडीओत सुनील पवार ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत इतर अधिकारी देखील मंचावर नृत्य करताना दिसत आहेत.

सांगली मिरज कुपवाड महापालिका वर्धापन दिनानिमित्त विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन सांगली आणि मिरजेत करण्यात आले आहे. त्यामध्ये मिरज बालगंधर्व नाट्यगृह येथे ‘कलासंगम 2024’ असा कार्यक्रम महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात चित्रपटातील गाणी गाणं, नृत्य, नाटक अशा विविध कला सादर करण्यात आला. यावेळी आयुक्त सुनील पवार, उपायुक्त स्मृती पाटील, राहुल रोकडे, वैभव साबळे, यांच्यासह सहाय्यक आयुक्त, सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.


महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमात भाग घेऊन हिंदी, मराठी चित्रपटातील गाण्यांवर डान्स सादर केला. त्यांच्या नृत्याने अनेकांची मने जिंकली आहेत. या कार्यक्रमात आयुक्त सुनील पवार यांनी ‘पुष्पा’ स्टाईलने डान्स करून कर्मचाऱ्यांसोबत आनंद लुटला. या गाण्यामध्ये उपायुक्त राहुल रोकडे, वैभव साबळे, पंडित पाटील, दिनेश जाधव, स्मृती पाटील यांनी आयुक्त यांना सहकलाकार म्हणून साथ देत आयुक्तांच्या डान्सला प्रतिसाद दिलाय.

आयुक्त सुनील पवार कोण आहेत?

सुनील पवार यांची ऑगस्ट 2022 मध्ये सांगली मिरज कपवाड महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. पवार सुरुवातीला आष्टा आणि इचलकरंजी येथे पालिकेत मुख्याधिकारी म्हणून कार्यकर्त होते. त्यांनी मुख्याधिकारी पदापासूनच प्रशासकीय कारकिर्दीस सुरुवात केली होती. या दरम्यानच्या काळात त्यांनी 2015 ते 2018 पर्यंत सांगली महापालिकेत उपायुक्त म्हणून काम पाहिलं होत. त्यानंतर चार वर्षांनी पुन्हा त्यांची सांगली महापालिकेक बदली झाली होती.

 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.