Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पृथ्वीच्या भोवताली हे काय आहे? VIDEO पाहून घाबरले लोक

पृथ्वीच्या भोवताली हे काय आहे? VIDEO पाहून घाबरले लोक

नवी दिल्ली : पृथ्वीचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तुम्ही असे कितीतरी व्हिडीओ पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून कित्येक लोक घाबरले आहेत. पृथ्वीच्या भोवताली असं काही दिसलं की पाहूनच धडकी भरते.

अंंतराळातील हा व्हिडीओ आहे. ज्यात पृथ्वीची दुर्दशा दिसते आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही धक्का बसेल. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता पृथ्वीच्या भोवती बरंच काही फिरताना दिसतं आहे. चंद्र, सूर्याप्रमाणे पृथ्वीही मावळते; असा तुम्ही कधीच पाहिला नसेल व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पृथ्वी स्वतःच्या वेगाने फिरत आहे. पृथ्वीभोवती काही गोष्टी वेगाने फिरत आहेत. काही जवळ आहेत तर काही दूर आहेत आणि गोलाकार परिघात फिरत आहेत. ही काही वैश्विक घटना नसून अंतराळात पसरलेली स्पेस जंक किंवा स्पेस कचरा आहे. जसा पृथ्वीवर कचरा असतो तसा अंतराळातही असतो.

पृथ्वीभोवती विज्ञानाच्या विकासाबरोबरच अवकाशातही कचरा पसरत आहे. विज्ञानाच्या माध्यमातून माणूस आपल्या सुविधा वाढवत आहे पण पृथ्वीच्या स्थितीचे काय होत आहे याकडे त्याचे लक्ष नाही. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @latestinspace नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे या व्हिडीओवर कमेंट करताना लोकांनी पृथ्वीला अंतराळातही त्याच नशिबाला सामोरं जावं लागत असल्याबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. एका युझरने म्हटलं, हे खूप भयानक आहे.

अंतराळात कचरा कसा होतो?

जेव्हा एखादं यान लाँच केलं जातं, तेव्हा ते अंतराळात पाठवण्यासाठी रॉकेटची मदत घेतली जाते. कित्येक वेळा हे रॉकेट आपलं काम झाल्यानंतर खाली समुद्रात पडतं, तर कित्येक वेळा ते अंतराळातच तरंगत राहतं. याव्यतिरिक्त काम पूर्ण झालेले किंवा निकामी झालेले कित्येक उपग्रह देखील पृथ्वीभोवती असेच फिरत असतात. यालाच अंतराळातील कचरा म्हणतात.

तुम्हाला माहिती आहे का कशावर असते पृथ्वी? ज्यामुळे ती कधीच खाली पडत नाही

संयुक्त राष्ट्रांच्या अंतराळातील गतिविधींवर लक्ष ठेवणाऱ्या संस्थेने एक आकडेवारी जाहीर केली आहे. यानुसार, जानेवारी 2022 पर्यंत पृथ्वीच्या भोवती 8,261 उपग्रह फिरत होते. यातील केवळ 4,852 उपग्रह सक्रिय होते. इतर उपग्रह बंद पडल्यामुळे केवळ जागा अडवून आहेत. केवळ उपग्रहच नाही, तर पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षेमध्ये विविध रॉकेट, यान आणि तुटलेल्या उपग्रहांचे तब्बल 12 कोटींहून अधिक तुकडे सध्या फिरत आहेत. केवळ पृथ्वीच्या भोवतीच नाही, तर चंद्राभोवती आणि चंद्राच्या पृष्ठभागावर देखील अशा प्रकारचा स्पेस कचरा आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.