Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डिव्हाईडरवर आदळली बस, मागून आली कार; भीषण अपघातात ५ ठार.. Video

डिव्हाईडरवर आदळली बस, मागून आली कार; भीषण अपघातात ५ ठार.. Video

मथुरा येथील महावन पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघाताची भीषण घटना घडली. डबलडेकर स्लीपर बसवरील वाहकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस डिव्हाईडरवर जाऊन आदळली. त्यातच, पाठिमागून येणारी स्वीफ्ट डिझाईर कार बसला जाऊन धडकली. या भीषण अपघातानंतर दोन्ही वाहनांना आग लागली. या आगीत कारमधील ५ जणांचा जळून मृत्यू झाला. या भीषण दुर्घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाच्या पथकानेही घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, या दुर्घटनेत कारमधील ५ जणांचा जळून मृत्यू झाला. तर, बस आणि कार जळून खाक झाली आहे.

आग्र्याहून ही बस नोएडा येथे जात होती. दरम्यान, डिव्हाईडरला धडकल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि भीषण अपघाताला कारणीभूत ठरले. दरम्यान, बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले. पण, कारमधील सर्वच प्रवाशांच्या जीवावर बेतले.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.