Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वरमाळेदरम्यान वधूने केली मस्करी; भडकलेल्या नवरदेवाने स्टेजवरच धक्का देऊन पाडलं, मग.., Video

वरमाळेदरम्यान वधूने केली मस्करी; भडकलेल्या नवरदेवाने स्टेजवरच धक्का देऊन पाडलं, मग.., Video

नवी दिल्ली : सोशल मीडियावर दिवसभरात अनेक फोटो आणि व्हिडिओ अपलोड केले जातात. अनेकदा हे व्हिडिओ आपलं मनोरंजन करतात. ते इतके मजेशीर असतात, की पाहून कोणीही खळखळून हसेल. अनेकदा हे व्हिडिओ भीतीदायक आणि घाबरवणारेही असतात. मात्र, कधीकधी यात अतिशय विचित्र घटना पाहायला मिळतात. ज्या पाहून नेटकऱ्यांनाही प्रश्न पडतो की हे पाहून हसावं की रागवावं. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ज्यामध्ये एका वधूने लग्नादरम्यान मस्करी करत आपल्या नवरदेवासमोर नखरे दाखवले. यानंतर रागाच्या भरात वराने जे काही केलं ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका लग्नाचा कार्यक्रम सुरू असल्याचं दिसत आहे. जिथे वधू-वराचा वरमाला कार्यक्रम सुरू आहे.


या कार्यक्रमावेळी नवरी-नवरदेवाशिवाय इतरही काही लोक स्टेजवर आहेत. वर वधूला हार घालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण वधू हार गळ्यात घालून घेत नाही. नवरदेवाने हार घालण्याचा प्रयत्न करताच वधू पुन्हा पुन्हा मागे सरकते. यामुळे नवरदेवाची चिडचिड होते आणि रागात मग तो वधूला धक्का देतो. यानंतर नवरी खाली पडते. नवरी खाली पडल्यानंतरही नवरदेव तिला उचलण्याऐवजी फुलांचा हार तिच्या अंगावर फेकून देतो.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @sanjayjourno नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. जो दोन लाखांहून अधिक वेळा पाहण्यात आला आहे. ही घटना खरी आहे की मनोरंजनाच्या उद्देशाने हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे, याची माहिती अद्याप मिळाली नाही. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोकांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिलं की, ‘संयमाची मर्यादा विश्वासाची मर्यादा ओलांडत आहे.’ आणखी एका युजरने लिहिलं आहे, ‘खतरनाक नवरदेव.’ इतरही अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.