Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

क्रुरतेचा कळस, दोन जणांनी कुत्र्याला केली जबर मारहाण, Video

क्रुरतेचा कळस, दोन जणांनी कुत्र्याला केली जबर मारहाण, Video

उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरात दोन तरुणांनी एका कुत्र्याला जबर मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ही घटना सआदतगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, गेट जवळ दोन कुत्रे बसले आहे. एक कुत्रा पळून गेला, तर एका कुत्र्याला दोन तरुणांनी काठीने जबर मारहाण करत आहे. कुत्रा रक्तबंबाळ अवस्थेत झाला आहे. त्याच्या पायाल गंभीर जखम झाल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. लखनऊ पोलिसांनी या प्रकरणी दखल घेतल्याचे दिसत आहे. दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील कारवाई सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.