Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, नागपुरातील धक्कादायक घटना; Video

माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, नागपुरातील धक्कादायक घटना; Video

नागपूर : आमदार नगरसेवक यांच्यावर हल्ला होत असल्याच्या घटना गेल्या काही दिवसात वाढत आहेत. मुंबई-पुण्यात फेब्रुवारी महिन्यात तर गोळीबार आणि हल्ला झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता नागपूरमध्येही माजी नगरसेवकावर हल्ल्या झाल्याची माहिती समोर आली आहे.

नागपूर जिल्ह्यातील कामठी इथे एका माजी नगरसेवकावर अज्ञात आरोपीने केला हल्ला. हा जीवघेणा हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या हल्ल्याचा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे. या हल्ल्यात माजी नगरसेवक दिलीप बांडेबूचे हे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

हल्ल्यात माजी नगरसेवक जखमी झाले असून कामठी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अज्ञात आरोपीने हॉकी स्टिक आणि लाकडी दांडक्याने हल्ला करुन पळ काढला. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दिलीप बांडेबूचे हे रात्री घरी जात होते. त्यावेळी हल्ल्याच्या तयारीत असलेल्या एका अज्ञाताने ते एकटे आहेत हे पाहून संधी साधली आणि त्यांच्यावर हल्ला केला, त्यांना जखमी केलं. रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत त्यांना पाहून अज्ञात आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

दिलीप यांच्यावर हा हल्ला कोणी केला? कोणत्या कारणातून झाला याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र या घटनेमुळे नागपुरातील कामठी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.