Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दोन वाघांमध्ये भयानक लढाई, शेवटी कोण जिंकलं पाहा VIDEO

दोन वाघांमध्ये भयानक लढाई, शेवटी कोण जिंकलं पाहा VIDEO

नवी दिल्ली : जंगलामध्ये एकापेक्षा एक भयानक आणि धोकादायक प्राणी राहतात. प्राण्यांच्या हल्ल्यात वाचणं खूप कठिण असतं त्यामुळे लोक तर प्राण्यांपासून दहा हात लांबच राहतात. अनेकदा प्राणीही एकमेकांशी चुरशीची लढाई करताना दिसून येतात. अवाढव्य, बलवान, सर्वच प्रकारचे प्राणी अनेकदा एकमेकांशीच लढाई करतात. अशा घटनांचे बऱ्याचदा व्हिडीओही समोर येत असतात. असाच एक जंगलातील एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यामघ्ये दोन वाघ एकमेकांवर तुटून पडलेत.

दोन वाघांच्या लढाईचा व्हिडीओ समोर आला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. दोघांमध्ये चुरशीची लढाईल पहायला मिळतेय. जंगलातील हा व्हिडीओ काही पर्यटकांनी शूट केला असून सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक वाघ जंगलात फिरत आहे. त्याचवेळी दुसरा वाघ तिथे येतो. दोन वाघ आमनेसामने येताच त्यांच्यात घनघोर लढाई सुरू होते. सुरुवातीला दोघेही एकदम जोशमध्ये भांडण करत असतात मात्र थोड्याच वेळात दोघेही थंड होतात आणि भांडण थांबवतात.


@crazyclipsonly नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 20 सेकंदांचा हा भांडणाचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओवर भरपूर कमेंट येत आहेत. अशा प्रकारच्या प्राण्यांच्या भांडणाचे व्हिडीओ कायमच समोर येत असतात. वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये चुरशीची लढाई रंगत असते. अशा भांडणांमध्ये, हल्ल्यांमध्ये काहींनी प्राण्यांना आपला जीवही गमवावा लागतो.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.