'माझं कुणीही....' भास्कर जाधव पोलिसांसमोरच नको ते बोलून गेले Video Viral
या भाषणात राणे कुटुंबावर सर्व नेत्यांनी तोंडसुख घेतले होते. याला प्रतिउत्तर देताना पत्रकार परिषद घेऊन माजी खासदार निलेश राणे यांनी आजच्या दिवसाचा अल्टिमेटम भास्कर जाधव यांना दिला होता. भास्कर जाधव यांच्या बालेकिल्ल्यात येऊन उत्तर देणार असल्याचे निलेश राणे यांनी जाहीर केले होते. दरम्यान, सभेआधीच दोन्ही समर्थकांमध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. आमदार भास्कर जाधव यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
...अन्यथा मी चाल करुन जाईल : भास्कर जाधव
जाहीर सभेआधी माजी खासदार निलेश राणे यांची चिपळूण मधून रॅली काढण्यात आली. निलेश राणे यांची रॅली भास्कर जाधव यांच्या कार्यालयाच्या समोर येताच दोन्ही गटाच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. भास्कर जाधव स्वतः कार्यालयाच्या बाहेर थांबले असल्याने कार्यकर्ते देखील जोरदार घोषणा बाजी करत होते. याच दरम्यान, निलेश राणे आणि भास्कर जाधव समर्थक आमनेसामने आले. दोन्ही कार्यकर्त्याकडून जोरदार दगडफेक करण्यात आली. जमावला नियंत्रणात आणण्यास पोलीस असमर्थ ठरत आहेत. हा संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे. यावेळी राणे समर्थकांना शांत राहण्यास सांगा अन्यथा मी चाल करेन. माझे कुणीही वाकडे करू शकणार नाही, असा इशाराच आमदार भास्कर जाधव यांनी दिला. आमचे कार्यकर्त्यांनी अद्याप संयम पाळला आहे.
जाधवांची टीका राणेंच्या जिव्हारी
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सिंधुदुर्गमध्ये जाऊन केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. ही टीका राणे यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे भास्कर जाधव यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी माजी खासदार निलेश राणे यांनी गुहागर मतदार संघामध्ये जाहीर सभा आयोजित केली आहे. मात्र, या सभेआधीच गुहागरमध्ये राडा झाला आहे.
दोन्ही गटात जोरदार राडा
जाहीर सभेआधी माजी खासदार निलेश राणे यांची चिपळूण मधून रॅली काढण्यात आली आहे. सभेमध्ये निलेश राणे हे भास्कर जाधव यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवणार असे स्पष्ट संकेत आहेत. थोड्याच वेळात निलेश राणे यांची रॅली भास्कर जाधव यांच्या कार्यालयाच्या समोर येणार आहे. याच पार्शवभूमीवर भास्कर जाधव आणि राणे समर्थक यांच्यामध्ये संघर्ष होण्याची चिन्हे देखील निर्माण झाली होती. भास्कर जाधव स्वतः कार्यालयाच्या बाहेर थांबले असल्याने कार्यकर्ते देखील जोरदार घोषणा बाजी करत आहेत. याच दरम्यान, निलेश राणे आणि भास्कर जाधव समर्थक आमनेसामने आले. दोन्ही कार्यकर्त्याकडून जोरदार दगडफेक करण्यात आली. जमावला नियंत्रणात आणण्यास पोलीस असमर्थ ठरत आहेत. हा संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
भास्कर जाधवांनी काय टीका केली होती?
रत्नागिरीत झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली होती. नारायण राणे पदांसाठी भीक मागत फिरणार असा हल्लाबोल भास्कर जाधव यांनी केला होता. या टीकेनंतर नारायण राणे यांनी भास्कर जाधव यांना प्रत्युत्तर दिलंय. भास्कर जाधव यांनी जर पुन्हा विधान केलं तर चोप देणार, सोडणार नाही, असा इशाराच नारायण राणे यांनी दिला. ठाकरे गटाच्या मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांनी नारायण राणेंवर सडकून टीका केली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.