Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विरुद्ध दिशेने जाणाऱ्या भाजप नगरसेवकाची गाडी अडवली, PSI ची कंट्रोल रुमला बदली

विरुद्ध दिशेने जाणाऱ्या भाजप नगरसेवकाची गाडी अडवली, PSI ची कंट्रोल रुमला बदली

छत्रपती संभाजीनगर : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यानंतर सर्वसामन्याकडून दंड आकारला जातो मात्र जर लोकप्रतिनिधींना सर्व नियम नियम माफ आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. याचे कारण म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा माजी नगरसेवकाला विरुद्ध दिशेने जाऊ न दिल्याने पीएसआयची कंट्रोल रूमला बदली करण्यात आल्याचा प्रकार समोर आहे. पोलिसाला कर्तव्य बजावल्याची शिक्षा मिळाली अशी प्रतिक्रिया या घटनेनंतर येत आहे.

वाहन चालवताना वेग हा रस्त्याची स्थिती, रहदारी व वाहनाची स्थिती लक्षात घेऊन मर्यादित ठेवावा. अती वेगाने वाहन चालवल्यास अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेकदा वाहनचालकांची चिडचिड होते. त्यामुळे अनेकँदा भांडणेदेखील होतात. हे सर्व प्रकार होत असताना वाहतूक पोलिसांचे काम वाहतुकीचे नियमन करण्यासाठी पोलिसाची नियुक्ती करण्यात येते. मात्र नियमांचे पालन करणाऱ्या पोलिसांवर कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या रॅलीमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये काही ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. शिवजयंतीला भाजपा माजी नगरसेवकाला साईड न जाऊ देणाऱ्या पीएसआयची कंट्रोल रूमला बदली करण्यात आली आहे. पोलिसांना कर्तव्य बजावण्याची शिक्षा मिळाली आहे. पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांची पीएसआय सचिन मिरधे यांनी कंट्रोलला बदली केली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.