Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रवाशांच्या जीवाचा खेळ सुरुच; PMPML चालकाने फोनवर बोलत एका हातानेच पळवली बस; व्हिडिओ व्हायरल

प्रवाशांच्या जीवाचा खेळ सुरुच; PMPML चालकाने फोनवर बोलत एका हातानेच पळवली बस; व्हिडिओ व्हायरल

पुणे : पुण्यात PMPML चालकांकडून प्रवाशांच्या जीवाशी खेळ केल्याच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. त्यात अरेरावीचे प्रकारही समोर आले आहे. यातच आता PMPML वाहन चालकाने फोनवर बोलत एका हाताने बस पळवल्याचा प्रकार समोर आलं आहे. यामुळे नागरिकांच्या आणि पुण्यातील प्रवाशांच्या जीवळी खेळ सुरुच असल्याचं समोर आलं आहे. चालकाचा फोनवर बोलताना गाडी पळवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पुण्यातील एका PMPML बसचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत चालक हा फोनवर बोलत प्रवासी असलेली बस चालवताना दिसत आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील ही बस असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ नेमका कोणत्या तारखेचा आहे, यासंदर्भात अजून कोणतीही माहिती मिळाली नाही आहे. मात्र या बसचा क्रमांक समोर आला आहे. MH 14 CH 2155 असा या बसचा क्रमांक आहे.


मागील काही दिवसांपासून पुण्यातील PMPML चालकाकडून असे प्रकार समोर आले आहेत. त्यातच प्रवाशांच्या जीवाशी खेळही सुरु असल्याचं दिसत आहे. या PMPML चालकांच्या अशा वागण्याने अनेक प्रवाशांचा जीव धोक्यात असल्याचं दिसत आहे. अशा चालकांवर यापूर्वी कारवाई करण्यात आली आहे. तरीही बाकी चालकांना धाक असल्याचं दिसून येत नाही आहे. त्यामुळे अशा चालकांवर कडक कारवाई करावी, या मागणीला जोर धरला आहे.

वाहन चालकांना अनेकदा सूचना देऊनही त्यांची अरेरावी कमी होताना दिसत नाही आहे. शिवाय फोनवर बोलून गाडी पळवणंदेखील सुरुच आहे. अशा सगळ्या चालकांसाठी कठोर नियमावली तयार करावी. यापूर्वी कामावर असताना कोणत्याही प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये, असे आदेश दिलेले आहेत. चालक आणि वाहकांची नियमित तपासणी झाल्यास पीएमपी बसच्या अपघाताचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. मात्र आता फोनसंदर्भातदेखील नियम आणण्याची गरज आहे.


अपघाताच्या संख्येत दुपटीनं वाढ

PMPML अपघाताच्या संख्येत आणि यात होणाऱ्या मृत्यूच्या आकडा दुपटीने वाढला असल्याचं समोर आलं आहे. बसचे एप्रिल ते सप्टेंबर 2022 दरम्यान 59 अपघात झाले होते. यात आठ जणांचा मृत्यू झाला होता. तर 2023 मध्ये हा आकडा दुपटीने वाढला आहे. पीएमपीचे एकूण 75 अपघात झाले. यात 19 जणांचा मृत्यू झाला. चालकांच्या हलगर्जीपणामुळे आणि चालकांच्या निष्काळजीपणामुळे हे अपघात वाढतं असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता ब्रेथ ॲनालायझर त्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.