Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

श्रीदेवी मृत्यूप्रकरणी मोठा खुलासा; PM मोदी, संरक्षण मंत्र्यांचा बनावट पत्रांचा हवाला

श्रीदेवी मृत्यूप्रकरणी मोठा खुलासा; PM मोदी, संरक्षण मंत्र्यांचा बनावट पत्रांचा हवाला

श्रीदेवी यांच्या निधनाबद्दल विविध दावे करणारी युट्यूबर आणि स्वयंघोषित गुप्तहेर दिप्ती आर. पिन्निटीविरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केलं आहे. श्रीदेव यांच्या निधनानंतर भारत आणि युएई सरकारकडून पुराव्यांची लपवाछपवी केल्याचा धक्कादायक आरोप तिने विविध युट्यूब व्हिडीओंद्वारे केला होता.

मात्र हे आरोप करताना तिने जी काही कागदपत्रं दाखवली, ती सर्व बनावट असल्याचं सीबीआयने स्पष्ट केलं आहे. याप्रकरणी आता भुवनेश्वर इथल्या दिप्तीच्या अडचणीत वाढ होणार आहे. दिप्तीने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतरही असेच धक्कादायक आरोप केले होते. श्रीदेवी यांचं निधन फेब्रुवारी 2018 मध्ये दुबईत झालं होतं. बाथटबमध्ये बुडून त्यांचं निधन झालं होतं. तर सुशांत त्याच्या वांद्रे इथल्या राहत्या घरी 14 जून 2020 रोजी मृतावस्थेत आढळला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नावाने पत्र

दिप्तीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून या दोन्ही मृत्यूंबद्दल धक्कादायक दावे केले होते. इतकंच नव्हे तर तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नावांची पत्रंदेखील दाखवली होती. मात्र हे सर्व पुरावे बनावट असल्याचं सीबीआयने म्हटलं आहे. मुंबईतल्या चांदनी शाह वकिलाने दिप्तीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर सीबीआयने तिच्याविरोधात चार्जशीट दाखल केला आहे. दिप्तीने तिच्या व्हिडीओंमध्ये किंवा लाइव्ह सेशन्समध्ये युएई सरकारचे जे रेकॉर्ड्स दाखवले, ते सर्व बनावट असल्याचं शाह यांनी स्पष्ट केलं.


दिप्तीच्या घरावर सीबीआयचा छापा

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सीबीआयने दिप्तीच्या घरावर छापा टाकत तिचे फोन्स आणि लॅपटॉप जप्त केले होते. सीबीआयने विशेष कोर्टात रिपोर्ट सादर केला असून त्यात दिप्तीने युट्यूबवर सादर केलेल्या सर्व कागदपत्रांना बनावट असल्याचं म्हटलंय. या चार्जशीटबद्दल प्रतिक्रिया देताना दिप्ती म्हणाली, “याप्रकरणी सीबीआयने माझा जबाबच नोंदवून घेतला नाही.”

स्वयंघोषित गुप्तहेर

‘सुशांत सिंह राजपूत, श्रीदेवी, दिशा सालियन आणि बॉलिवूड क्षेत्रातील इतर रहस्यमयी मृत्यूंबाबत तपास करणारी बिझनेसवुमन’ असा दिप्तीचा उल्लेख युट्यूब व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे. नुकत्याच एका व्हिडीओमध्ये दिप्तीने असा दावा केला की तिची टीम दुबईला गेली होती. तिथल्या हॉस्पीटलमधून खरी कागदपत्रं मिळवण्यासाठी तिची टीम दुबईला गेल्याचं तिने म्हटलं होतं. इतकंच नव्हे तर ही कागदपत्रं कोर्टासमोर सादर केल्याचंही तिने म्हटलंय. “अनेकजण मला विचारतात की मी हे पुरावे कोर्टात का सादर करत नाही, सोशल मीडियावर का खुलासा करते? त्यांना मी सांगू इच्छिते की मी आधीत हे पुरावे कोर्टात सादर केले आहेत”, असंही तिने स्पष्ट केलंय.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.