Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Paytm ची डोकेदुखी वाढली! कोर्टाने लावला दंड, FASTag वापरणाऱ्यांनो अवश्य वाचा

Paytm ची डोकेदुखी वाढली! कोर्टाने लावला दंड, FASTag वापरणाऱ्यांनो अवश्य वाचा

बंगळुरु : ऑनलाइन पेमेंट कंपनी Paytm चे सध्या खूप वाईट दिवस सुरु आहेत. बँकिंग नियम कायद्याचं पालन न केल्यामुळे RBI ने पेटीएम विरोधात कठोर पावलं उचलली आहेत. Paytm विषयी आणखी एक वृत्त समोर आलंय. एका व्यक्तीच्या Paytm FASTag मध्ये पुरेसं बॅलेन्स होतं. तरीही टोलवर रक्कम डिडक्ट झाली नाही. यामुळे व्यक्तीला फाइन भरावा लागला. पीडित व्यक्तीने Paytm हेल्पलाइन नंबरवर आपली तक्रार दाखल केली. असा आरोप केला जातोय की, कंपनीकडून कोणताही रिस्पॉन्स आला नाही. यानंतर व्यक्तीने कोर्टाचं दार ठोठावलं होतं. आता कोर्टाने Paytm आणि त्याच्या ऑपरेटरवर दंड लावला आहे.

हे प्रकरण बंगळुरुचं आहे. कंज्यूमर कोर्टाने Paytm आणि ऑपरेटर कंपनीवर दंड लावत आदेश दिला की, त्यांनी पीडित पक्षाला व्याजासह पैसे रिफंड करावेत आणि 10 हजार रुपये दंड म्हणूनही द्यावेत. Paytm ला ही रक्कम रिफंड करण्याचा आदेश देण्यात आला आहे. जी टोल प्लाजावर पेनाल्टी म्हणून व्यक्तीला भरावी लागली होती. मीडिया रिपोर्टनुसार, बसावनगुडी येथिल रहिवासी हरिशेष यांनी 23 डिसेंबर 2023 ला Paytm वरुन तीन FASTagखरेदी केले होते. अर्जानुसार, Paytm FASTag फेब्रुवारी 2022 पर्यंत योग्य प्रकारे काम करत होते. त्याच वर्षी 13 फेब्रुवारीला एक FASTag मध्ये अडचण येऊ लागली. परिपूर्ण बॅलेन्स असुनही FASTag मध्ये रक्कम शून्य दाखवली जात होती.

कंपनीकडे तक्रार

Paytm FASTag मध्ये समस्या आल्यानंतर हरिशेषने कंपनीमध्ये तक्रार नोंदवली होती. मात्र कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. एवढंच नाही टोल प्लाजावर आणखी जास्त पैसे कट होऊ लागले. यानंतर हरिशेषने 24 मार्च 2022 ला Paytm ला कायदेशीर नोटीस पाठवली. यानंतर नोव्हेंबर 2022 ला त्यांनी डिस्ट्रिक्ड कंज्यूमर कोर्टात कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल केली. ही Paytm सोबतच ऑपरेटर कंपनी One97 कम्यूनिकेशन्स लिमिटेडलाही पार्टी बनवलं गेलं. हरिशेषने आपले पैसे परत मागितले होते.


Paytm ने यावर काय म्हटलंय?

Paytm ची बाजू मांडणाऱ्या अधिवक्ताने तक्रार चुकीची असल्याचं ठरवण्याचा प्रयत्न केला होता. Paytm ने कोर्टाला सांगितलं की, ते फक्त सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. याचिकाकर्त्याचं अकाउंट ब्लॉक करण्यात आलेलं नव्हतं. अशा वेळी FASTag योग्य प्रकारे काम केलं पाहिजे होतं. Paytm च्या वकिलाने तक्रार आधारहिन असल्याचं ठरवतं बरखास्त करण्याची मागणी केलीहोती. मात्र कंज्यूमर कोर्टाने Paytm ची विनंती फेटाळत पैसे रिफंड करणे आणि पीडित व्यक्तीला दंड देण्याचा आदेश दिला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.