राज्य कर्मचाऱ्यांना DA वाढीसोबतच मिळणार घरभाडे भत्ता वाढीचा लाभ !
राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची अपडेट समोर आली आहे. खरंतर येत्या काही दिवसात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका रंगणार आहेत.
यासाठी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचार संहिता देखील जाहीर होणार आहे. दरम्यान लोकसभा निवडणुका नंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या देखील निवडणुका सुरू होणार आहेत. अशा परिस्थितीत, सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार असे बोलले जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकार लवकरच त्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ देणार आहे. केंद्र शासनाकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला की लगेच महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारच्या माध्यमातून महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाईल असे वृत्त समोर आले आहे.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता मिळत असून यामध्ये चार टक्के वाढ होणे अपेक्षित आहे. विशेष बाब अशी की राज्य कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर एवढीच महागाई भत्ता वाढ दिली जाणार आहे. अर्थातच राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 50% एवढा होणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, जेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% क्रॉस करेल तेव्हा त्यांचा घर भाडे भत्ता देखील सुधारित होणार आहे. अशा परिस्थितीत आता आपण राज्य कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्ता कितीने वाढणार हे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किती वाढणार HRA ?
सध्याच्या घडीला X , Y , Z श्रेणीतील कर्मचा-यांना अनुक्रमे 27 टक्के , 18 टक्के ,9 टक्के या प्रमाणात घरभाडे भत्ता मिळत आहे. आता मात्र यात तीन टक्क्यांपर्यंत वाढ होणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. जेव्हा डी.ए 50 टक्के होईल त्यावेळी HRA 1 टक्क्यांपासून ते तीन टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.म्हणजे X श्रेणीमधील कर्मचाऱ्यांचा HRA 30 टक्के, Y श्रेणीमधील कर्मचाऱ्यांचा HRA 20 टक्के व Z श्रेणीमधील कर्मचाऱ्यांचा HRA 10 टक्के असा होणार आहे. म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीबरोबरच घरभाडे भत्ता वाढीचा सुद्धा लाभ मिळणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.