Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

CIBIL Score खराब असेल तर तो कसा सुधारू शकता, जाणून घ्या

CIBIL Score खराब असेल तर तो कसा सुधारू शकता, जाणून घ्या

कर्ज घेण्यापासून ते क्रेडिट कार्डपर्यंत अनेक वित्तीय संस्थांकडून तुम्ह CIBIL स्कोअरबद्दल ऐकलं असेल. कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीचा सिबिल कसा आहे, हे ते तपासून पाहतात. अनेकांना सिबिलबद्दल माहिती नसते. जेव्हा तुम्ही कर्ज घेण्यासाठी बँकेकडे किंवा वित्तीय संस्थेकडे जाता, तेव्हा तुम्हाला सिबिलचं महत्त्व समजतं. तर आज जाणून घेऊ सिबिल म्हणजे काय आणि काय आहे त्याचं महत्त्व.

CIBIL म्हणजे काय?

सिबिल म्हणजेच क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड. ही एक कंपनी आहे जी क्रेडिटची माहिती देते. ही कंपनी व्यक्ती किंवा संघटनांच्या क्रेडिट संबंधित माहिती आणि अन्य बाबींचे रेकॉर्ड तयार करून आपल्याकडे ठेवते.

जेव्हा कोणतीही व्यक्ती कर्जासाठी अर्ज करते, तेव्हा त्याचा सिबिल तपासला जातो. बँका, वित्तीय संस्था अन्य वित्तीय संस्था, ग्राहकांची क्रेडिट माहिती, ब्युरोकडे पाठवतात आणि त्या ठिकाणी त्यांचा रेकॉर्ड ठेवला जातो. या दिलेल्या माहितीच्या आधारे सिबिल, क्रेडिटशी निगडीत सीआयआर जारी करतो आणि ग्राहकांना एक क्रेडिट स्कोअर देतो. यालाच सिबिल स्कोअर असं म्हणतात.


किती असतो स्कोअर?

कोणत्याही व्यक्तीचा सिबिल स्कोअर ३०० ते ९०० च्या दरम्यान असतो. सिबिल ही तीन अंकी संख्या आहे, जी कोणत्याही व्यक्तीची कर्ज घेण्याची क्षमता दर्शवते. उच्च क्रेडिट स्कोअर एखाद्याला जलद मंजुरी आणि कर्ज, तसंच क्रेडिट कार्डवर चांगले फायदे मिळविण्यात मदत करते. बहुतांश बँका आणि बिगर-बँक वित्तीय संस्थांना कर्जाच्या मंजुरीसाठी ग्राहकांचा किमा क्रेडिट स्कोअर ६८५ आवश्यक असतो.

या स्कोअरवरून कर्ज देणाऱ्या बँकेला एखाद्या व्यक्ती वेळेवर कर्ज फेडण्याची किती शक्यता आहे, याचा अंदाज येतो. याचाच अर्थ एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर त्याची लोन डिफॉल्ट होण्याची शक्यता कमी होते. अशातच सिबिल स्कोअर कमी असेल तर बँका सतर्क होतात. अशा प्रकरणात बँका आपल्याकडून तपास करून नंतर लोनसाठी प्रक्रिया करतात.


सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी काय कराल? वेळेवर कर्जाची परतफेड

तुमचे क्रेडिट कार्ड बिल असो किंवा कर्जाचा EMI, तुम्ही तुमचे कर्ज वेळेवर परत करणं महत्वाचं आहे. कोणत्याही थकबाकीच्या रकमेची परतफेड न केल्यानं तुमच्या क्रेडिट रेटिंगवर परिणाम होतो. मुख्यत्वे तुम्ही तुमच्या ईएमआयची रक्कम वेळेवर भरणं आवश्यक आहे. असं न केल्यास त्यावर दंड लागू शकतो. तसंच तुमच्या क्रे़डिट स्कोअरवर परिणामही होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या ईएमआयची तारीख आणि वेळेवर रक्कम भरणं हे महत्त्वाचं आहे.

एकावेळी अधिक कर्ज घेऊ नका

तुमचा CIBIL स्कोअर सुधारण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे तुम्ही एकावेळी अधिक कर्ज घेऊ नये याची खात्री करणं. दुसरं कर्ज घेण्यापूर्वी तुम्ही तुमचे पहिले कर्ज फेडलं आहे याची खात्री करा. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होत नाही. जर तुम्ही एकावेळी जास्त कर्ज घेतलं तर ते फेडण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा निधी नाही असा कर्जदाराचा समज होऊ शकतो.

संतुलन राखा

जीवनातील विविध गरजा पूर्ण करण्यासाठी बहुतेक लोकांना विविध प्रकारचं कर्ज घ्यावं लागतं. पण जेव्हा तुम्ही कर्ज घेता, तेव्हा त्यात सिक्युअर्ड आणि अनसिक्युअर्ड कर्ज एकत्र आहे याची खात्री करा. जेथे होम लोन आणि कार लोन सिक्युअर्ड लोन खाली येतात. तर, क्रेडिट कार्डावरी कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज अनसिक्युअर्ड लोन आहे. त्यामुळे संतुलन राखणं महत्त्वाचं आहे.

क्रेडिट कार्डाचा वापर मर्यादेत करा

जेव्हा क्रेडिट स्कोअर सुधारण्याचा प्रश्न येतो, तेव्हा कर्जदारांनं दिलेल्या मर्यादेपर्यंत तुमचं क्रेडिट कार्ड न वापरणे हा एक मार्ग आहे. एका महिन्यात तुमच्या कार्डावर क्रेडिट मर्यादेच्या फक्त ३० टक्के खर्च करा. उदाहरणार्थ, जर तुमची क्रेडिट मर्यादा दरमहा २ लाख रुपये असेल तर तुमचा मासिक खर्च फक्त ६० हजार रुपयांपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करा. जर तुमची क्रेडिट परतफेड चांगली असेल तर तुमची बँक तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्डवरील क्रेडिट मर्यादा वाढवण्यास सांगू शकते. हे क्रेडिट लिमिट तुम्ही वाढवून घेऊ शकता. याचा अर्थ तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डवरील खर्च वाढवा असा नाही. क्रेडिट मर्यादा जास्त ठेवा, परंतु खर्च मर्यादित करा, ज्यामुळे तुमचा CIBIL स्कोअर सुधारेल.

क्रेडिट रिपोर्टमधील चुका

तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये काही चुका असू शकतात ज्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही तुमचं पर्सनल लोन पूर्णपणे फेडलं आहे, परंतु काही एररमुळे ते अनपेड दाखवत आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर तपासत राहणं महत्त्वाचं आहे आणि तो एरर फ्री राहावा यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.