Cadbury Dairy Milk उघडताच तरुण हादरला; आत दिसली किळसवाणी गोष्ट, VIDEO
नवी दिल्ली : फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना आहे, म्हणजेच व्हॅलेंटाइनचा महिना आहे. यादरम्यान कपल्स एकमेकांना भेटवस्तू देतात. या भेटवस्तूमध्ये बुके, गुलाब, चॉकलेट अशा भेटवस्तू देण्यात येतात. मात्र, व्हॅलेंटाईन डेच्या आधी हैदराबादमधील एका व्यक्तीने चॉकलेटचा एक असा व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. आता ही घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
रॉबिन जॅकियस नावाच्या व्यक्तीने हैदराबादमधील एका रिटेल स्टोअरमधून कॅडबरी डेअरी मिल्क चॉकलेट विकत घेतलं होतं. हे चॉकलेट शहरातील एका मेट्रो स्थानकावरून खरेदी करण्यात आलं होतं. कॅडबरी डेअरी मिल्क चॉकलेटचं रॅपर काढल्यानंतर त्या व्यक्तीला आतमध्ये एक जिवंत अळी रेंगाळताना दिसली. रॉबिनने याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
रॉबिनने शहरातील अमीरपेट मेट्रो स्टेशनवरील रत्नदीप रिटेल स्टोअरमधून घेतलेल्या चॉकलेटचं बिलदेखील जोडलं, ज्यासाठी त्याने 45 रुपये बिल भरलं होतं. रॉबिनने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'आज रत्नदीप मेट्रो अमीरपेटमध्ये खरेदी केलेल्या कॅडबरी चॉकलेटमध्ये एक अळी रेंगाळताना दिसली. या उत्पादनांची गुणवत्ता चाचणी केली जाते का? यासाठी कोण जबाबदार आहे?'
ही पोस्ट लगेचच व्हायरल झाली आणि लोकांनी कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. एका यूजरने लिहिलं, 'कॅडबरीच्या टीमकडे तक्रार करा. ते नमुने घेण्यासाठी आणि चाचणी घेण्यासाठी येतील.' दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली, 'त्यांच्यावर खटला दाखल कर आणि नुकसानभरपाईची मागणी कर.' तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिलं, 'चांगल्या वकिलाचा सल्ला घ्या आणि योग्य न्यायालयात खटला दाखल करा, तुम्हाला आणखी भरपाई मिळू शकेल.' इतरही अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.