Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News!अंतरवालीतील मंडप हटवण्याचे आदेश !

Breaking News!अंतरवालीतील मंडप हटवण्याचे आदेश !

मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आजच्या अधिवेशनात त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत होती. त्यानंतर एसआयटी मार्फत करण्यात येणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं होतं.

त्यानंतर आता मनोज जरांगें यांच्या उपोषणस्थळावरील मंडप काढण्याचे आदेश देण्यात आले असून, आता त्याठिकाणी पोलीस देखील पोहोचले आहेत. दरम्यान राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मनोज जरांगें पाटील चांगलेच संतापले आहेत.

जरांगें पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर ते उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. मात्र पोलीस घटनस्थळी दाखल झाल्याची बातमी मिळाल्यानंतर ते अंतरावलीला रवाना झाल्याची माहिती आहे. दरम्यान त्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर काही तासांपूर्वीचदेवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर माफी मागितली होती. अर्थसंकल्प अधिवेशनात याबाबत पडसाद उमटले होते. जरांगेंने केलेल्या आरोंपांमगे कोणाचातरी हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.