Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

साखरपुड्यानंतर होणाऱ्या पत्नीसोबत अश्लिल चाळे करणे पोलिसाला भोवले; विनयभंगाचा गुन्हा दाखल

साखरपुड्यानंतर होणाऱ्या पत्नीसोबत अश्लिल चाळे करणे पोलिसाला भोवले; विनयभंगाचा गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : साखरपुड्यानंतर पोलिसाने भावी पत्नीसोबत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसावर बेगमपुरा पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला.

३१ डिसेंबर २०२३ ते १ फेब्रुवारी दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात हा प्रकार घडला. गणेश कडूबा मोरे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. तो पोलिस आयुक्तालयातील आरसीपी (दंगल नियंत्रण पोलिस) पथका कार्यरत आहे.

बेगमपुरा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय रिया (नाव काल्पनिक) पीडिता आहे. ती एमएसएफमध्ये (महाराष्ट्र सुरक्षा बल) कार्यरत आहे. डिसेंबर २०२३ पूर्वी तिचा आरोपी गणेश मोरे याच्यासोबत साखरपुडा झाला. त्यामुळे त्यांची चांगली ओळख झाली. या ओळखीतूनच मोरे तिला भेटण्यासाठी म्हणून विद्यापीठात बोलवायचा. रियादेखील त्याला भेटायला जायची. ३१ डिसेंबर २०२३ ते १ फेब्रुवारी पर्यत ते अधूनमधून भेटले. यादरम्यान, आरोपीने आपला साखरपुडा झालेला आहे, असे सांगून लग्न होण्यापूर्वीच अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. विनयभंग करून समाजात बदनामी होईल, अशी परिस्थिती निर्माण केली. त्यामुळे रियाच्या मनाला धक्का बसला. त्यावरून तिने बेगमपुरा पोलीस ठाणे गाठून गणेश मोरेविरुद्ध विनयभंग आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

आरोपी मोरेचे पहिल्या लग्नानंतर सोठचिठ्ठी

बेगमपुरा पोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपी गणेश मोरे याचे आधी लग्न झालेले आहे. पहिल्या पत्नीपासून त्याला एक मुलगाही आहे. मात्र, पहिल्या पत्नीने सोडचिठ्ठी दिल्यामुळे त्याने पीडितेसोबत साखरपुडा केला. दरम्यान, तिच्यासोबत अश्लील चाळे केल्यामुळे आता गणेश मोरेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक रेखा लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हिवराळे करीत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.