पंतप्रधान मोदींनी पाण्यातील द्वारका नगरीचे घेतले दर्शन; शेअर केले फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरात दौरा केला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी द्वारका नगरीला भेट दिली. द्वारका नगरी पाण्यात बुडाल्याचा लोकांची श्रद्धा आहे. या पाण्यातील नगरीचे दर्शन पंतप्रधान मोदींनी घेतले आहे. मोदींनी एक्सवर काही फोटो पोस्ट करुन याची माहिती दिली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी पाण्यातील द्वारका नगरीचे दर्शन घेतल्यानंतर आपला अनुभव कथन केला आहे. ते म्हणाले की, हा अद्भूत अनुभव आहे. पाण्यात बुडालेल्या द्वारका नगरीचे दर्शन घेण्याचा हा पवित्र अनुभव आहे. वेळेचे बंधन नसलेल्या आणि गतकाळातील आध्यात्मिक भव्यतेशी जोडून घेतला आहे. भगवान कृष्ण सगळ्यांना आशीर्वाद देतील अशी इच्छा व्यक्त करतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, पुरातन द्वारका नगरी ही भगवान श्रीकृष्णाची आहे. द्वारका कधीकाळी भव्यता आणि प्रगतीची प्रतिक होती. पंतप्रधान मोदी यांनी द्वारकाधीश मंदिराचे दर्शन घेतले आहे. त्यांची ही भेट ऐतिहासिक ठरली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.