Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चेहऱ्यावर मोठे मोठे फोड; शिव ठाकरेची अवस्था पाहून चाहते हैराण

चेहऱ्यावर मोठे मोठे फोड; शिव ठाकरेची अवस्था पाहून चाहते हैराण

आपला हक्काचा माणूस म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे शिव ठाकरे. बिग बॉस मराठी २ चा विजेता ठरलेला शिव मराठीसह हिंदी कलाविश्वातही लोकप्रिय आहे. 'बिग बॉस १६', खतरों के खिलाडी अशा कितीतरी गाजलेल्या रिअॅलिटी शोमध्ये तो सहभागी झाला होता. त्यामुळे त्याची लोकप्रियता आता मर्यादित राहिलेली नाही. नुकताच तो झलक दिखला जा ११मध्ये पाहायला मिळाला. या शोमुळे तो चर्चेत होता. मात्र आता तो वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. सध्या त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्याची अवस्था पाहून चाहते चितेंत पडले आहेत. या व्हिडीओत तो रस्त्यावर भीक मागताना दिसतो आहे.

https://www.instagram.com/reel/C2910pMNe16/?utm_source=ig_web_button_share_sheet

शिव ठाकरेचा सोशल मीडियावर व्हिडीओ पाहायला मिळतो आहे, त्यात तो प्रोस्थेटिक मेकअप करताना दिसतो आहे. त्यात टक्कल, चेहऱ्यावर मोठे मोठे फोड असा एकदम विद्रुप अवतारात दिसत आहे. अशा अवतारात तो रस्त्यावर लोकांकडे भीक मागताना दिसत आहे. भीक मागताना काहींनी त्याला हटकलं तर कुणी घाबरलं. मात्र एका रिक्षावाल्या काकांना त्याची दया आली आणि त्यांनी त्याला पैसे दिले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.