पब्लिसिटी स्टँड महागात! अक्षय कुमारला चप्पलांचा प्रसाद
अभिनेता अक्षय कुमार आणि टाइगर श्रॉफ त्यांच्या आगामी बडे मियाँ छोटे मियाँ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. सिनेमाच्या प्रमोशनसाठी दोघेही संपू्र्ण देशात फिरत आहेत. प्रमोशनसाठी ते लखनऊला गेले असता एक धक्कादायत प्रकार घडला.
कार्यक्रमाला धक्कादायक वळण लागल्यानं यूपी पोलिसांना जमाव नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. जमावात असलेल्या लोकांनी अक्षय कुमार आणि टाइगर श्रॉफ यांच्यावर चप्पल फेकून मारल्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोमवारी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ बडे मियाँ छोटे मियाँ सिनेमाच्या प्रमोशनसाठी लखनऊमध्ये होते. दोघांना पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की मोठ्या संख्येनं चाहते उपस्थित आहेत. पण गर्दीनं काही वेळातच चप्पल फेक झाली आणि चेंगराचेंगरी झाली.
अक्षय कुमारच्या कार्यक्रमात चप्पल फेक आणि चेंगराचेंगरी झाल्यानंतर यूपी पोलिसांनी अनियंत्रित जमावावर लाठीचार्ज केला. गर्दी नियंत्रित आणण्यासाठी तसंच जमावाला गैरवर्तन करण्यापासून रोखण्यासाठी हा लाठीचार्ज करावा लागला. या प्रकारानंतर अक्षय आणि टायगर जमावापासून सुरक्षित अंतरावर ठेवण्यात आलं होतं.बडे मियाँ छोटे मियाँच्या प्रमोशन इव्हेंट आयोजन करणाऱ्या पीआर कंपनीचे प्रतिनिधी आनंद कृष्णा यांनी सांगितले, "इव्हेंटमध्ये चाहत्यांच्या दिशेनं काही वस्तू फेकण्यात आल्या. त्या वस्तू पकडण्यासाठी चाहत्यांनी गर्दीतून धाव घेतली. त्यांनी सेफ्टीसाठी लावण्यात आलेले बॅरिकेड्स तोडले". त्याचप्रमाणे आयोजक समितीत सहभागी असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, या प्रकारानंतर अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी नियोजित वेळेच्या आधीच शो सोडला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.