पायांमध्ये दिसतात हार्ट अटॅकची लक्षणे, वेळीच ओळखा आणि सावध व्हा!
आजकाल धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही. तसेच बदलती जीवनशैली आणि चुकीचा आहार यामुळे तरुण वयात अनेक गंभीर आजारांना सामोरे जावं लागत. परिणामी हार्ट अटॅक, कोलेस्ट्रॉल, रक्तदबाव, मधुमेह यांसारख्या आजारांचे बळी पडतात. यामध्ये दिवसेंदिवस हार्ट अटॅक येणे ही एक सामान्य गोष्ट होत चालली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने अनेकांचा मृत्यू होतो. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हार्ट अटॅक आल्यानंतर अनेकांचा जीव वाचतो तर अनेकजणांना जीव गमवावा लागतो. मात्र तुम्ही आता हार्ट अटॅक येण्यापूर्वी तुमच्या पायांमध्ये काही अशी लक्षणे दिसतात, त्यामुळे तुम्ही वेळीच सावध होऊ शकता.
तसेच हार्ट अटॅक येण्यापूर्वी आपले शरीर 24 तास अगोदर लक्षणे दाखवत असते. जर हार्ट अटॅक येण्यापूर्वी अनेकांना त्याची लक्षणे ओळखू आली तर अनेकांचा जीव वाचू शकतो. चला तर जाणून घेऊया पायांमध्ये हार्ट अटॅकची कोणती लक्षणे दिसतात?
पायांमध्ये दिसणार कार्डिअॅक अरेस्टची लक्षणे
शरीरात अशी अनेक लक्षणे दिसतात जी साधी असल्याने लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे शरीरात अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ लागतात. फारच कमी लोकांना याची जाणीव असते की काहीवेळा शरीरात दिसणारी सामान्य लक्षणे ही हार्ट अटॅक सारख्या गंभीर आजाराची लक्षण असू शकतं. हार्ट अटॅक, कार्डिअॅक लक्षणे केवळ छातीत नाही तर इतर अनेक भागांमध्येही दिसतात. हा आजार शरीराच्या अवयवांमध्ये देखील दिसून येतो. पायांमध्ये आणि आजूबाजूला दिसणारी काही लक्षणे ही हार्ट अटॅकसारखी गंभीर आजाराची लक्षणे असू शकतात, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करु नका.
पायाच्या त्वचेचा रंग बदलणे
हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीराच्या अनेक भागांच्या त्वचेत काही बदल दिसून येतात, ज्याकडे दुर्लक्ष करू नये. विशेषत: हार्ट अटॅक पाय इत्यादींपेक्षा जास्त अंतरावर असलेल्या भागांमध्ये बदल अधिक दिसतात. तुमच्या त्वचेत काही बदल आढळल्यास, तुम्ही एकदा तुमचे हृदय तपासावे. हृदयविकाराचा झटका किंवा हृदयाशी संबंधित कोणत्याही आजारापूर्वी अशी लक्षणे दिसू शकतात.
पायांना सूज येणे
जेव्हा हृदय योग्यरित्याकार्य करणे थांबवते, तेव्हा शरीराच्या अनेक भागांना सूज येऊ लागते आणि यामध्ये प्रामुख्याने पाय आणि इतर भागांचा समावेश होतो. जसे की पाय आणि घोट्या. जर सकाळी तुमच्या शरीराच्या अशा कोणत्या ही भागात सूज येत असेल तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधाव. कारण ते काही हार्ट अटॅकशी संबंधित आजाराचे लक्षण असून शकते.
दोन्ही पाय दुखणे
तज्ञांच्या मते, पाय दुखणे हे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचे पहिले लक्ष नाहीत. परंतु हृदयाशी संबंधित अनेक रोग आहेत ज्यामुळे पाय दुखू शकतात. याचा अर्थ पाय दुखणे हे कोणत्याही हृदयविकाराचे प्रारंभिक लक्षण असू शकते आणि हृदयाशी संबंधित बहुतेक आजारांमुळे अचानक हृदयविकाराचा धोका वाढतो.
त्वरित डॉक्टरांचा संपर्क
तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणालाही अशी लक्षणे आढळल्यास, उशीर न करणे आणि शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले. विशेषत: जर तुम्हाला हृदयाशी संबंधित कोणतीही समस्या असेल किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्य हृदयाचे रुग्ण असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'सांगली दर्पण' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.