Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अंगणवाडी सेविकांसाठी मोठी खुशखबर! पेन्शनसह पावणे दोन लाखांपर्यंत ग्रॅच्युटी मिळणार

अंगणवाडी सेविकांसाठी मोठी खुशखबर! पेन्शनसह पावणे दोन लाखांपर्यंत ग्रॅच्युटी मिळणार


राज्य सरकार अंगणवाडी सेविकांसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू होणार आहे. तसेच सरकार अंगणवाडी सेविकांना ग्रॅच्युटी देखील देण्याच्या तयारीत आहे.

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना १ लाख ५५ हजार पासून ते १ लाख ७६ हजारापर्यंत ग्रॅच्युटी मिळण्याची शक्यता आहे. शिंदे सरकारच्या निर्णयानुसार राज्यातील दोन लाख अंगववाडी सेविका आणि मदतनीसांना याचा लाभ मिळणार आहे.

शिंदे सरकार अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना पेन्शन आणि ग्रॅच्युटी लागू करण्याच्या तयारीत आहे. या निर्णयानुसार, अंगवाडी सेविका आणि मदतनीसांना १ लाख ५५ हजार पासून ते १ लाख ७६ हजारापर्यंत ग्रॅच्युटी मिळण्याची शक्यता आहे. विभागाकडून पेन्शन किती द्यायची यावर सल्लामसलत सुरु आहे. येत्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महिला व बालविकास विभागाचा प्रस्ताव येण्याची दाट शक्यता आहे.

किती जणांना लाभ मिळणार?

अंगणवाडी सेविकांनी संप सुरू केल्यानंतर सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. या निर्णयाने २ लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत. या निर्णयामुळे १ लाख १० हजार अंगणवाडी सेविका आणि ९० हजार मदतनीस यांना पेन्शन योजना आणि ग्रॅज्युटीचा लाभ मिळणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.