अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची भविष्याच्या चिंतेने आत्महत्या
घरची बिकट आर्थिक परिस्थिती आणि शिक्षणासह विवाहासाठी लागणारी रक्कम, मुलाबाळांचा खर्च कसा करायचा, या विवंचनेतून नैराश्यात गेलेल्या नीरज विकास सरगडे (वय 23, रा. बागेश्री अपार्टमेंट, सुधाकरनगर, कोल्हापूर) या विद्यार्थ्याने राहत्या फ्लॅटमध्ये ग्राईंडर मशीनने गळा कापून घेत आत्महत्या केली.
रविवारी (दि. 18) सायंकाळी ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. निरज अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून, तो सध्या दुसऱया वर्षात शिकत होता. निरजच्या आत्महत्येची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे.
निरज हा आई आणि आजोबांसोबत सुधाकरनगरातील बागेश्री अपार्टमेंटमध्ये राहत होता. काल घरी कोणी नसताना निरजने भविष्याच्या चिंतेने टोकाचे पाऊल उचलले. निरजने आत्महत्या करण्यापूर्वी शिक्षणासह विवाहासाठी लागणारी रक्कम, मुलाबाळांचा खर्च कसा करायचा, भावी जीवनाबद्दल चिंता वाटत असल्याने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली होती.
बंद प्लॅटमधून ग्राईंडर मशीनचा आवाज सातत्याने येत राहिल्याने शेजारच्या लोकांनी अपार्टमेंटची वीज बंद केली. त्यानंतर निरजला हाका मारल्या; पण प्रतिसाद न मिळाल्याने लोकांनी पोलीस व अग्निशमन दलाला बोलवले. अग्निशमन दलाच्या जवानांनी मागच्या बाजूने फ्लॅटमध्ये प्रवेश करून पाहणी केली असता, त्यांना नीरज हा बेडरुममध्ये रक्ताच्या थोराळयात दिसून आला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.