Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'तुम्हाला मुलं बाळं आहेत की नाही...'; एका आईचा आक्रोश, मराठा आंदोलकांशी भिडल्या तीन महिला

'तुम्हाला मुलं बाळं आहेत की नाही...'; एका आईचा आक्रोश, मराठा आंदोलकांशी भिडल्या तीन महिला

मराठा आंदोलककर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १५ वा दिवस अजून त्यांनी सरकारने दिलेले १० टक्के आरक्षण स्वीकारण्यास नकार देत २४ फेब्रुवारीपासून राज्यभर रास्ता रोको करण्याचे आवाहन मराठा बांधवांना केलं होतं.

यानुसार राज्यातील अनेक शहरात मराठा आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. यामुळे अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. ॲम्बुलन्स, परीक्षार्थी विद्यार्थ्यांना मराठा समाजानं रस्ता करुन देत सामाजिक बांधिलकी जपली. मात्र काही ठिकाणी रुग्णालयात जाणाऱ्या गाड्या अडवल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र नांदेडमध्ये रुग्णालयात मुलाला घेऊन जाणाऱ्या महिलेची गाडी अडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्याचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.  नांदेडमध्ये मराठा आंदोलनादरम्यान खासगी बस गाडी अडवल्याने तीन महिलांनी आंदोलकांशी झटापट केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मनाठा पाटीजवळ ही घटना घडली. नांदेडच्या मनाठा पाटीजवळ मराठा बांधवांकडून रास्ता रोको आंदोलन सुरू होते. मात्र यावेळी मराठा आंदोलकांनी एक बस अडवल्याने मोठा वाद झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये महिला आंदोलकांशी झटापट करताना दिसत आहे.

एका बसमधून मुलाला दवाखान्यात नेले होते होते. खासगी बस हदगावकडून नांदेडकडे जात असताना नाठा पाटीजवळ रास्तारोको करणाऱ्या आंदोलकांनी अडवली. त्यानंतर बसमधून तीन महिला खाली उतरल्या. त्यांनी मुलाला नांदेडला दवाखान्यात न्यायचे असल्याने बस पुढे जाऊ द्या, अशी विनवणी केली. मात्र आंदोलनकांनी थोडीही दयामया न दाखवता बस रोखून धरली. बस जाऊ देत नसल्याने अखेर महिलांनी आंदोलकांशी झटापट केली. गाडीच्या ड्रायव्हर जवळ जाऊन ही महिला आक्रोश करत होती. त्याचवेळी या महिलेच्या हातातील बांगड्या देखीलही फुटल्या. मात्र मराठा आंदोलकांनी गाडी पुढे सोडली नाही. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, आंदोलक बस चालकाला दम देत आहेत की, गाडी पुढे घेऊन तर दाखव.. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. मुलाला दवाखान्यात नेण्यासाठी आईचा आक्रोश पाहून बसमधील सर्व प्रवासी गहिवरले. 

आंदोलकांने नवी कोरी बाईक जाळली -

नांदेडमध्ये मराठा आंदोलनानं पेट घेतल्याचं पहायला मिळतंय. जिल्हाभरात मराठा समाज रस्त्यावर उतरला असून ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनादरम्यान नांदेडच्या लोंढे सांगवी येथील शिवहरी लोंढे या मराठा आंदोलकानं उस्माननगर रस्त्यावर आपली स्वतःची दुचाकी जाळून रास्ता रोको आंदोलन केलं. सरकारचा निषेध करत या तरुणानं आपली स्वतःची दुचाकी भररस्त्यात जाळली. त्यामुळं हे आंदोलन आणखी पेटून उठण्याची दाट शक्यता आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.