Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न

लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न


माजी उपपंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचे नेते लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा सरकारने केली आहे. लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न देण्याची बातमी देताना आपल्याला अत्यंत आनंद होत आहे. मी त्यांच्याशी बोलून त्यांचं अभिनंदन केलं आहे. आमच्या काळातील ते एक सर्वाधिक आदरणीय नेते आहेत, त्याचं भारताच्या विकासातलं योगदान मोठं आहे. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवर लिहिलं आहे.

लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी कराची येथे झाला. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात आले. 1941 साली ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्वयंसेवक झाले. त्यांनी राजस्थानमध्ये संघाचे प्रचारक म्हणूनही काम केले. 1951 साली ते भारतीय जनसंघात सहभागी झाले. 1970 साली ते राज्यसभेत निवडले गेले. 1977 साली जनता पार्टीचे सरकार आल्यावर ते राज्यसभेचे सभागृह नेते झाले आणि केंद्रीय मंत्रिमंडळात माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री झाले.

जनसंघ ते भाजप या प्रवासात आडवाणींइतकं योगदान कुणीही दिलेलं नाही, असं राजकीय विश्लेषकांना वाटतं. भाजपच्या दुसऱ्या पिढीतील म्हणजेच आज सत्ताधारी बाकांवर बसलेल्या 90 टक्के लोकांना त्याठिकाणी पोहोचवण्यात आडवाणींचं योगदान असल्याचं बोललं जातं. 1984 मध्ये भाजपच्या दारुण पराभवानंतर 1996 मध्ये सरकार स्थापन करण्यापर्यंतच्या प्रवासात आडवाणींचं योगदान दुर्लक्षित करता येणार नाही.


राममंदिर आंदोलनाच्या काळात देशातील सर्वात लोकप्रिय नेता असूनही आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वरहस्त असतानाही आडवाणींनी 1995 मध्ये वाजपेयींना पंतप्रधानपदाचा दावेदार घोषित करून सर्वांना चकित केलं होतं. स्वत: पंतप्रधान होऊ शकत असतानाही, भाजपमध्ये वाजपेयींपेक्षा दुसरा मोठा नेता कुणीही नाही, असं अडवाणी म्हणाले होते. पन्नास वर्षे ते वाजपेयींसोबत दुस-या क्रमांकाचे नेते बनून राहिले.

पन्नास वर्षांहून अधिक काळ राजकारणात असूनही आडवाणींवर कोणताही आरोप नव्हता आणि 1996 च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या नरसिंह राव यांनी विरोधी पक्षातील बड्या नेत्यांना हवाला घोटाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आडवाणी यांनी सर्वप्रथम राजीनामा दिला आणि या प्रकरणातून निर्दोष मुक्तता होईपर्यंत मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असं ते म्हणाले होते. 1996 च्या निवडणुकीनंतर त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली. अशा प्रकारचं धाडस दाखवणं प्रत्येकाला जमत नाही, असं तज्ज्ञ सांगतात.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.