Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीतील 'या' गामपंचायतीचा ठराव, 'निवडणुका बॅलेटपेपरवर घ्या'

सांगलीतील 'या' गामपंचायतीचा ठराव, 'निवडणुका बॅलेटपेपरवर घ्या'


सांगली :  देशभरात ईव्हीएमवर निवडणुकांचे मतदान घेण्यास विरोध वाढत चालला आहे. काही दिवसांपूर्वीच दिल्लीत या मागणीसाठी मोठे आंदोलन झाले. तत्पूर्वी, सुप्रीम कोर्टातील काही वकिलांनी सुद्धा आंदोलन केले होते. आता हा विरोध देशभरातील ग्रामीण भागात देखील पोहचल्याचे दिसत आहे.  महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेटफळेच्या ग्रामसभेत ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर आगामी निवडणुकांचे मतदान घेण्याचा ठराव घेण्यात आला.

शेटफळे ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शारदा गायकवाड होत्या. यावेळी, आगामी काळात येणाऱ्या लोकसभा व विधानसभेसह सर्व सार्वत्रिक निवडणुका ईव्हीएम मशीनऐवजी मतपत्रिकेवर घ्या, असा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी ईव्हीएमला जोरदार विरोध दर्शवला.

ग्रामसेवक आर. एम. कोळी यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. यानंतर आगामी सर्व निवडणुका ईव्हीएमऐवजी  मतपत्रिकेवर घेण्याचा ठराव मांडला. त्यास एकमताने पाठिंबा देत मंजुरी देण्यात आली. शेटफळे येथील बाजार पटांगणात ही ग्रामसभा झाली. यावेळी माजी प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी, प्रा. सी. पी. गायकवाड,  उपसरपंच ज्ञानेश्वर वाघमारे, माजी उपसरपंच विजय देवकर उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.