Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खळबळजनक! ...अन् भाजपा नेत्याने रुग्णालयामध्ये दाखवली रिव्हॉल्वर

खळबळजनक! ...अन् भाजपा नेत्याने रुग्णालयामध्ये दाखवली रिव्हॉल्वर

बिहारमधील पाटणा येथील IGIMS रुग्णालयात रुग्णाच्या कुटुंबातील सदस्याने रिव्हॉल्वर दाखवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णाच्या कुटुंबातील एकाने रिव्हॉल्व्हर दाखवल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून योग्य उपचार होत नसल्याचे रुग्णाच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. यावर रूग्णालयाने रूग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर असून तो व्हेंटिलेटरवर आह. मात्र त्याच्या उपचारासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचं सांगितलं आहे.

याप्रकरणी आयजीआयएमएसच्या डॉक्टरांनी एफआयआर दाखल केला आहे. याप्रकरणी शास्त्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी भाजपा नेते सुमित आणि इतर काही लोकांना अटक केली आहे. या प्रकरणावर बोलताना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, कुसुम लता या रेड झोन क्रमांक 17 मध्ये व्हेंटिलेटरवर होत्या. याआधी त्यांच्यावर आरा येथे उपचार सुरू होते आणि तेथेही त्या व्हेंटिलेटरवर होत्या. रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे. याच अवस्थेत त्यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "रविवार आणि सोमवार या दोन्ही दिवशी उपचार सुरू होते आणि त्याच दरम्यान एफआयआरमध्ये नाव असलेले त्यांचे कुटुंबीय आले आणि त्यांनी आमच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी भांडण सुरू केलं आणि रुग्णावर योग्य उपचार करा, असे सांगू लागले. रुग्णाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आमच्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.


कुटुंबातील आणखी एक सदस्य तेव्हा आत आला आणि त्याने रिव्हॉल्वर दाखवायला सुरुवात केली. तो पार्टीचा सचिव असल्याचं सांगत होता. हॉस्पिटलमध्ये गोंधळ झाल्यानंतर सुरक्षा कर्मचारी आले आणि त्यांनी त्याला बाहेर काढलं. पण बाहेर गेल्यावर त्याने पुन्हा गोंधळ सुरू केला आणि दरवाजा जोरजोरात वाजवण्यास सुरुवात केली. या घटनेने काही वेळ गोंधळाचं वातावरण होतं.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.