Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

साखरपुड्याच्या तयारीसाठी गेले अन् चोरट्यांनी घर साफ केलं

साखरपुड्याच्या तयारीसाठी गेले अन् चोरट्यांनी घर साफ केलं


पुणे : तक्रारदार हे त्यांच्या लहान बहिणीच्या साखरपुड्याची पूर्व तयारी करण्यासाठी फ्लॅटला कुलूप लावून गेले होते. याच संधीचा फायदा घेऊ चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना 12 फेब्रुवारी सकाळी साडेदहा ते 18 फेब्रुवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या दरम्यान, धायरी परिसरातील रायकर मळा येथील रुद्रांगण हौसिंग सोसायटीत घडली आहे.


याबाबत विनायक रमेश लाखन (वय-25 रा. रुद्रांग हौसिंस सोसायटी, धायरी) यांनी मंगळवारी (दि.20) सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अज्ञात चोरट्या विरोधात आयपीसी 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या लहान बहिणीच्या साखरपुड्याची पूर्व तयारी करण्यासाठी जनता वसाहत येथे गेले होते.

चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजाचे कडी कोयंडे व कुलूप उचकटून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील बेडरुममध्ये असलेल्या लोखंडी कपाटातील लॉकरचे कुलूप उचकटून लॉकरमधील 3 लाख 55 हजार रुपये किंमतीचे 58 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. फिर्यादी 18 फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घरी आले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निकम करीत आहेत.

 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.