Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पंतप्रधान मोदींच्या पोस्टर्ससह छेडछाड; माजी मंत्री नितीन राऊत यांच्या मुलाला अटक

पंतप्रधान मोदींच्या पोस्टर्ससह छेडछाड; माजी मंत्री नितीन राऊत यांच्या मुलाला अटक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टर्सची फाडा फाड केल्या प्रकरणी नागपूर युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांना अटक करण्यात आली आहे. कुणाल राऊत हे माजी मंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र आहेत.

या कारावाईमुळे एकच खळबळ उडाली.  कुणाल राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शनवारी संध्याकाळी नागपूर जिल्हा परिषदेत जाऊन "मोदी की गॅरंटी" अशा आशयाच्या पोस्टर्स वर काळे फासले होते. तसेच मोदी या शब्दावर दुसरे स्टिकर्स लावून पोस्टर्सची खोडतोड केली होती. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी आज कुणाल राऊत यांना नोटीस बजावून पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगितले होते. मात्र कुणाल राऊत आणि त्यांचे सहकारी सकाळपासूनच बेपत्ता होते. नागपूर जिल्ह्यातील कुही मधून रविवारी सायंकाळी नागपूर पोलिसांनी कुणाल राऊत यांना ताब्यात घेतले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.