Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीच्या व्यापाऱ्याला २६ लाखांना गंडवले

सांगलीच्या व्यापाऱ्याला २६ लाखांना गंडवले


प्लॉट विकसित करण्यासाठी आणि बिअर शॉपीला भांडवल म्हणून घेतलेली २६ लाख ५०० रुपये रक्कम परत करण्यास नकार देऊन एका व्यापाऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रफुल्ल महादेव कमलाकर  रा.सुरेखा पॅलेस, ८० फुटी रस्ता, इंटक भवन समोर, विश्रामबाग) यांनी संशयित राजू ऊर्फ रशीदखान बाबासाब जमादार (रा. डी-मार्टच्या मागे, शंभर फुटी रस्ता, सांगली ) याच्याविरुद्ध सांगली शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी कमलाकर यांचा कुपवाड एमआयडीसी मधील प्लॉट विकसित करण्यासाठी संशयित जमादार याने १५ लाख रुपये घेतले होते. या रकमेवर २५ लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. तसेच, मिरजेतील गुरू बिअर ॲन्ड वाईन शॉप चालविण्यासाठी फिर्यादी कमलाकर यांच्याकडून १२ लाख रुपये घेतले होते.

दि.१६ नोव्हेंबर २०१७ ते दि.२५ जानेवारी २०१८ या कालावधीत हा प्रकार घडला. फिर्यादी कमलाकर यांनी संशयित जमादार यास बँकेतून ऑनलाईन २६ लाख २५ हजार रुपये दिले होते. वारंवार मागणी करूनही जमादार यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे कमलाकर यांना लक्षात आले. त्यामुळे जमादार विरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.