Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खूर्चीला हजार किलो सोनं; हिऱ्यांच्या सिंहासनाचं टॉयलेट, भारतातले गर्भश्रीमंत

खूर्चीला हजार किलो सोनं; हिऱ्यांच्या सिंहासनाचं टॉयलेट, भारतातले गर्भश्रीमंत


स्वातंत्र्याच्या वेळी भारतात 562 संस्थानं अस्तित्वात होती. प्रत्येकाचे स्वतंत्र शासक, राजा, नवाब आणि निजाम होते. या राजा-महाराजांना एका पेक्षा एक भिन्न छंद होते. शिकारीपासून मोटारी, क्रीडा, महाल आणि हरम या सगळ्याचं स्थान त्यांच्या आयुष्यात अद्वितीय होतं.

राजांना हिऱ्या-मोत्याच्या दागिन्यांबद्दल सर्वाधिक प्रेम होतं. बडोद्याचे महाराज सोनं आणि हिऱ्याच्या दागिन्यांची जवळपास पूजाच करत असत. ते त्यांच्या दरबारात जो पोषाख परिधान करून जात असत, तो पोषाख सोन्याच्या तारेनं तयार केलेला असे आणि त्यांच्या संस्थानात एकच कुटुंब असं होतं, ज्याला या सोन्याच्या तारा विणण्याची परवानगी होती.

कपडे तयार करणारं एकच कुटुंब

इतिहासकार डॉमिनिक लॅपियर आणि लॅरी कॉलिन्स यांनी त्यांच्या 'फ्रीडम ॲट मिडनाइट' या पुस्तकामध्ये लिहिलं आहे, की जे कुटुंब महाराजा बडोदा यांचा पोषाख तयार करत असे, त्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची नखं इतकी मोठी वाढू दिली होती, की ती नखं कंगव्याच्या दातांसारखी कापता यावीत. मग नखांमध्ये तयार झालेल्या त्या कंगव्याच्या साह्याने ते लोक सोन्याच्या तारेचा ताण अगदी ताठ ठेवून कापड विणू शकत होते.

बडोद्याच्या महाराजांकडे हिऱ्यांचा जो ऐतिहासिक संग्रह होता, त्यामध्ये जगातला सातव्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा हिरा सितार-ए-दख्खन याचासुद्धा समावेश होता. हा हिरा फ्रान्सचे सम्राट नेपोलियन तृतीय यांनी आपली प्रेयसी यूजीन यांना दिला होता. त्यांच्या रत्नभांडारात सर्वाधिक बहुमूल्य मोत्यांपासून तयार केलेले किती तरी पडदे होते. त्यांवर लाल आणि हिरव्या किमती खड्यांची अतिशय सुंदर वेलबुट्टी तयार केलेली होती.

गादीवर जडवलं 1120 किलो सोनं

म्हैसूरच्या महाराजांची गोष्ट आणखीच निराळी होती. त्यांच्या सिंहासनावर अठ्ठावीस मण सोनं (साधारण 1120 किलो) जडवलेलं होतं आणि त्या सिंहासनावर चढण्यासाठी सोन्याच्या नऊ पायऱ्या तयार करण्यात आल्या होत्या. भगवान विष्णूंनी सत्यापर्यंत जाताना टाकलेल्या नऊ पावलांचं प्रतीक मानून या पायऱ्या तयार करण्यात आल्या होत्या.

ओडिशाच्या महाराजांचं सिहासन खूप मोठ्या पलंगासारखं तयार करण्यात आलं होतं. त्यांनी जुन्या मौल्यवान वस्तू विकणाऱ्या लंडनमधल्या एका व्यापाऱ्याकडून ते खरेदी केलं होतं आणि त्यामध्ये आपल्या ऐपतीनुसार खूप हिरे, खडे जडवून घेतले होते. याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं होतं की, राणी व्हिक्टोरिया यांनी आपल्या मधुचंद्रासाठी हुबेहुब अशाच पद्धतीचा पलंग वापरला होता.

सिंहासनाचं केलं शौचालय

रामपूरच्या नवाबांचं सिंहासन खास होतं. हे सिंहासन एका अशा हॉलमध्ये ठेवण्यात आलं होतं, तो एका चर्चसारखा मोठा होता. ज्या चौथऱ्यावर हे सिंहासन ठेवण्यात आलं होतं, त्याचे खांब दुधाळ रंगाच्या संगमरवराचे होते आणि त्यावर नग्न स्त्रियांचे चेहरे कोरलेले होत्या. त्यांच्या राजसिंहासनाचं आणखी एक वेगळेपण असं होतं की, सिंहासनाच्या जरीच्या गादीला मधोमध गोल आकारात कापण्यात आलं होतं. त्याच्या बरोबर खाली एक भांडं (पॅन) ठेवलेलं असायचं. हे नवाब आपल्या दरबाराच्या कामकाजात कोणताही अडथळा न आणता बसल्या जागी शौचविधी करत असत. याची प्रेरणा फ्रान्सचा सम्राट चौदावा लुई याच्याकडून घेण्यात आली होती.

राजा-महाराजांचा रिकमा वेळ कसा जात असे?

डॉमिनिक लॅपियर आणि लॅरी कॉलिन्स लिहितात, की राजा - महाराज बहुतांश वेळ रिकामाच ठेवत असत. आपला रिकामा वेळ घालवण्यासाठी स्त्रिया आणि खेळ हे त्यांचे छंद असत. हिंदू असो वा मुसलमान प्रत्येक राजाच्या महालात एक हरम नक्कीच असायचा. त्यामध्ये रोज नवीन नर्तिका आणि अन्य स्त्रिया आणल्या जात असत आणि या हरममध्ये अन्य कोणाचाही हस्तक्षेप चालत नसे. सामान्यपणे प्रत्येक संस्थानच्या जंगलांवरसुद्धा राजाचाच अधिकार असायचा. तिथं राहणारे पशु-पक्षी आणि प्रामुख्यानं सिंह, हे राजांच्या बंदुकीला बळी पडण्यासाठीच होते. भारतात सिंहांची संख्या 1947 मध्ये 20,000 होती. भरतपूरच्या महाराजांनी वयाच्या आठव्या वर्षी सिंहाची पहिली शिकार केली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.