Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरण: गणेश मारणे व विठ्ठल शेलारच्या पोलिस कोठडीत वाढ

कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरण: गणेश मारणे व विठ्ठल शेलारच्या पोलिस कोठडीत वाढ

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात मुख्य सूत्रधार गणेश मारणे व विठ्ठल शेलार आहेत. त्यांच्या मोबाइलमधील कॉल रेकॉर्डिंग तपासायचे आहेत, तसेच मोक्का कोठडीत असलेल्या अन्य आरोपींसोबत त्यांची समोरासमोर चौकशी करायची आहे.

त्यासाठी मारणे व शेलारच्या मोक्का कोठडीत तीन दिवसांची वाढ करावी, तर अन्य आरोपींना न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी केली. त्यानुसार मारणे व शेलार यांच्या मोक्का कोठडीत मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी दि. १७ फेब्रुवारीपर्यंत वाढ केली.


मोहोळ खूनप्रकरणी मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह हल्लेखोर साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, अभिजित अरुण मानकर यांच्या 'मोक्का' कोठडीची मुदत गुरुवारी संपली. त्यामुळे त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. शरद मोहोळचा खून झाल्यानंतर आरोपी गणेश मारणे व विठ्ठल शेलार हे फरार झाले होते. 


या कालावधीत त्यांना कोणी मदत केली, तसेच त्यांनी काही मालमत्ता खरेदी केली आहे का, याचा तपास पोलिस करणार आहेत. त्यासाठी मारणे व शेलारच्या मोक्का कोठडीत तीन दिवसांची वाढ करावी, तर अन्य आरोपींना न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली. बचाव पक्षातर्फे ॲड. राहुल देशमुख, ॲड. केतन कदम आणि ॲड. दादासाहेब भोईटे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यावर मारणे व शेलारच्या मोक्का कोठडीत वाढ केली, तर अन्य आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. दरम्यान, या प्रकरणात गणेश मारणे पंधरा दिवसांपासून, तर विठ्ठल शेलार २३ दिवसांपासून कोठडीत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.